सैनिकी शाळांमध्ये ‘NDA’ परीक्षा बंधनकारक; पुढील वर्षापासून सुधारित अभ्यासक्रम लागू | Sainik School Admission

Sainik School Admission

Sainik School Admission

Sainik School Admission :एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये (राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी) मराठी मुलांचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न सध्या अधिक जोमाने सुरु आहेत. एनडीए हे भारतीय सैन्य दलांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आणि महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे, जेथे भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलासाठी अधिकारी प्रशिक्षण घेतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील अनेक तरुणांना लहानपणापासून देशसेवेची प्रेरणा मिळत असते, आणि याच प्रेरणेच्या जोरावर मराठी विद्यार्थ्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे. सध्या राज्य सरकार आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून विशेष मार्गदर्शन शिबिरे, कोचिंग, आणि आवश्यक शारीरिक आणि मानसिक तयारीची सुविधा पुरवली जात आहे. या प्रयत्नांमुळे मराठी मुलांना एनडीए प्रवेश परीक्षेत चांगले यश मिळण्याची संधी मिळते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील मुलांना एनडीएसाठी प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासक्रम, वर्कशॉप, मॉक टेस्ट्स, तसेच अनुभवशीर प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाते. हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि शारीरिक तयारीवर भर देऊन त्यांना एनडीएच्या कठोर प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करतात. एनडीएमध्ये मराठी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास, देशाच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचा सहभाग अधिक दृढ होईल.

पुढील वर्षापासून सुधारित अभ्यासक्रम लागू

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेशाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत. २०२५-२६ पासून सुधारित अभ्यासक्रम लागू होणार आहे. इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणकशास्त्र हे विषय बंधनकारक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षणशास्त्र, स्टूटेजिक स्टडीज, आर्मी स्टडीज, रोबोटिक सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रुप टास्क, एसएसबी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य या विषयांचा समावेश असणार आहे

सर्व सैनिकी शाळांमधील विद्याथ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा देणे बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील ३८ सैनिकी शाळांना हा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे ‘एनडीए’मधील मराठी मुलांचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.
अनुदानित सर्व सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांची ‘एनडीए मध्ये संख्या वाढावी. जास्तीत जास्त विद्यार्थी भरती व्हावेत. त्यांनी देशसेवा करावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. २६ सप्टेंबर १९९५ मध्ये सैनिकी शाळांसाठी धोरण तयार करण्यात आले होते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सैनिकी शाळांच्या शिक्षण पद्धतीसोबतच  अभ्यासक्रम उपयुक्त होण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना  सुधारणा करण्यात आल्या आहेत…

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण
परिषदेचे संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या सुधारणा शिफारशी अहवालास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. नवीन सुधारित धोरणानुसार, सैनिकी शाळांमध्ये अध्यापनाचे इंग्रजी व सीबीएसई हे माध्यम असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींना संधी मिळावी, यासाठी सहशिक्षणाची संधी देण्यात आली आहे. सैनिकी शाळांच्या मंडळावर सैन्यदलातील सेवानिवृत्त ब्रिगेडिअर किंवा कर्नलपदावरील व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या धोरणातील शिफारशीनुसार एनसीसी तुकडी मंजुरी, खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक आहार मिळण्यासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. मोफत गणवेश, अत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा, आयसीटी लॅब उपलब्ध करून दिली जाणार आहे.


Sainik School Admission

Sainik School Admission : राज्यातील अनुदानित सैनिकों शाळांतील विद्याव्यांचा राष्ट्रीग संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएतील टक्का वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील सैनिकी शाळांची सुमारे २० वर्षांनी शुल्कवाढ करण्यात आली असून, आता वा शाळांना वार्षिक ५० हजार रुपये शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे… या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शालेय शिक्षण विभागाने गाबाबतचा शासन निर्णय नऊ ऑक्टोबरला, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रसिद्ध केला. राज्यात एकूण ३८ अनुदानित सैनिकी शाळा आहेत. मात्र, या शाळांतून ‘एनडीए’त निवड होणाऱ्या विद्याष्यांची संख्या अत्यल्प असल्याने सैनिकी शाळांसाठी सुधारित धोरण लाइ करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या सुधारणांबाचतच्या शिफारशी असलेल्या अहवालाला राज्य मंत्रिमंडळाने ३० सप्टेंबर रोजी मान्यता दिली. त्यानुसार, आता राज्यातील अनुदानित सैनिकी शाब्यंना सुधारित धोरण लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांत इंब्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे, तसेच, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अनासक्रम एनडीए आणि इतर स्पधों परीक्षांशी सुसंगत असल्याने बाथ अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सुधारित अभ्यासक्रम २०२५-२६ वा मौक्षणिक वसांपासून सुरू करण्यात येणार आहे.. या शाळांचे शैक्षणिक वर्ष २ एप्रिल ते ३१ मार्च असे असणार आहे. अनुदानित साव्यंचील शुल्क २००२- ०३ मध्ये १५ हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर शुल्कनिश्चिती करण्यात आलेली नाही.

शाळांमध्ये विविध उपक्रम

या अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यात मोफत गणवेश योजना, प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, संगणक प्रयोगशाळा, आयसीटी लॅब, खेळांचे साहित्य व क्रीडांगण विकास, संथालय आधुनिकीकरण, हॅकथॉन अशा उपक्रमांचा समावेश आहे

‘एनडीए” प्रवेश परीक्षा बंधनकारक
राज्यातील सर्व सैनिकी शाळांतील बारावीच्या प्रत्येक विद्याथ्र्याला व विद्यार्थिनीला एनडीएची प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळांनी तवारी करून घेणे आवश्यका राहील. या निकषाची पूर्तता न करणाच्या शाळांचे अपोलर सर्वसाधारण अनुदानित शाळेत करण्यासह शाळेला दिले जाणारे अनुदान बंद करून दिलेली जमीन परत घेतली जाणार असल्याचेही स्याह करण्यात आले आहे.


Sainik School Admission: Sainik School Entrance Test 2024: सैनिकी शाळेत प्रवेश घ्यावा असं स्वप्न बाळगणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शैक्षणिक सत्र २०२१ साठी देशातील एकूण ३३ सैनिकी शाळांमधील प्रवेशासाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेची घोषणादेखील झाली आहे. सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर aissee.nta.nic.in येथे यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी झाले आहे.

सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी मध्ये प्रवेश होतील. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी आणि नववी प्रवेशांसाठी देशभरात ही प्रवेश परीक्षा (AISSEE 2021) १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाईल.

कधी आणि कसा भरायचा अर्ज? – Sainik School Admission

सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. एआयएसएसईई चे संकेतस्थळ aissee.nta.nic.in द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारी २० ऑक्टोबर २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२० आहे.

अर्ज करण्याच्या वेळीच परीक्षा शुल्क भरावे लागेल. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ४०० रुपये, अन्य सर्व प्रवर्गांसाठी ५५० रुपये आहे.

वयोमर्यादा

इयत्ता सहावीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १० ते १२ वर्षादरम्यान असावे. मुलींसाठी सर्व सैनिकी शाळांमध्ये केवळ इयत्ता सहावीतील प्रवेशाचा नियम आहे.

इयत्ता नववीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १३ ते १५ वर्षांदरम्यान असावे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण असायला हवे.

Sainik School Entrance Exam Notification 2021  – https://bit.ly/3dGSzcu

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड