युवा रोजगार मेला २०२५ – ७ लाखांच्या पॅकेजसह थेट प्लेसमेंटची सुवर्णसंधी! | ३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग! | Job Mela 2025: ₹7 Lakh Offer!
Job Mela 2025: ₹7 Lakh Offer!
सध्या कॅम्पस द्वारे नोकरी मिळणे हे एक मोठे अचिव्हमेंट मानले जाते. ३१ मे रोजी वेदांता फाउंडेशन आणि बियानी ग्रुप ऑफ कॉलेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूरमधील बियानी कॉलेज कॅम्पसमध्ये ‘युवा रोजगार मेला २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले. या मेळ्याचे उद्दिष्ट होते – युवकांना इंटर्नशिपसह थेट प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देणे. या भव्य मेळ्यामध्ये देशभरातील नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अनेक उज्वल दारं खुली केली.
२.५ लाख ते ७ लाख वार्षिक पॅकेज – थेट नोकरीची संधी!
या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २.५ लाख ते ७ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे. हा एक प्रकारचा क्रांतिकारी उपक्रम ठरला असून, विद्यार्थीवर्गाला शिक्षणानंतर थेट रोजगार मिळवण्यासाठीचा उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे. यामध्ये ५00 हून अधिक युवकांनी सहभाग घेतला आणि ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विप्रो, इन्फोसिसपासून ते मॅरियटपर्यंत ३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग!
या मेळ्यात सहभागी झालेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये विप्रो, इन्फोसिस, फोर्टिस, एक्सिस बँक, एसबीआय लाइफ, हयात, मुथूट ग्रुप, वाउ मोमो, ट्रेंट लिमिटेड यांचा समावेश होता. अशा प्रथितयश संस्थांच्या उपस्थितीमुळे युवकांना अधिक विश्वासाने व आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली.
मुख्य अतिथी न्यायमूर्ती जे. के. रांका यांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून राजस्थान उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश जे. के. रांका यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “वेदांता फाउंडेशनच्या या प्रयत्नामुळे बेरोजगारीवर मात होण्यास मदत होते. हे रोजगार मेळे फक्त नोकरी देत नाहीत, तर युवकांना योग्य दिशा आणि कौशल्यांचं मूल्य समजावून देतात.”
७,००० हून अधिक नोकऱ्यांचा उद्दिष्ट
वेदांता फाउंडेशनने यावर्षी देशभरात अशा ७,००० पेक्षा अधिक नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे भारतातील विविध भागातील तरुणांना समान संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
कौशल्यविकासासह आर्थिक स्थिरतेची दिशा
या रोजगार मेळ्याचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे, युवकांना त्यांच्या शैक्षणिक पातळीवर आधारित नोकऱ्या मिळाल्या. यामुळे कौशल्यविकासासह आर्थिक स्थिरता आणि आत्मनिर्भरतेकडे समाज वाटचाल करत आहे. हा उपक्रम केवळ नोकरीपुरता मर्यादित राहिलेला नसून, व्यापक सामाजिक बदलांचा आरंभसुद्धा ठरतो आहे.
शेकडो युवकांचा सहभाग – नव्या भविष्याचा प्रारंभ!
या मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदाने सांगितले की, “हे मेला आमच्यासाठी पर्वणी ठरले आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी थेट संवाद साधत आमचं मूल्यांकन केलं आणि संधी दिली.” हे रोजगार मेळे युवकांना त्यांच्या क्षमता ओळखण्याची आणि योग्य संधी मिळवण्याची व्यासपीठं उपलब्ध करून देत आहेत.