नोकरीची चिंता- कॅम्पस मुलाखतीनंतर…

Jobs After Campus Interview

Jobs After Campus Interview – सध्या करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात देशभरात मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम इंजिनीअरिंगची पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांवर होणार आहे असे चित्र सध्या दिसत आहे. कॉलेजांमध्ये कॅम्प्स प्लेसमेंटची सुविधा असूनही, ७६ टक्के पदवीधरांना नोकरी मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. तसंच कॅम्पस निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमोरही, पुढे काय? असं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. (आपण खाजगी कंपनी मध्ये जॉब शोधू शकता- येथे जॉब्स पहा)

इंजिनीअरिंग आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाला आलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी कॅम्पस मुलाखती होऊन विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या करोनामुळे संकटात सापडल्या आहेत. आयआयटी मुंबईमधल्या विद्यार्थ्यांचीही अशीच परिस्थिती असून देश-विदेशातील अनेक कंपन्यांनी करोनासंकटामुळे विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला नसल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. तर, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होतील, असं काही जाणकारांना वाटतंय. इन्क्युबेशन लॅब असलेल्या ब्रिजलॅब्जनं अलीकडेच एक सर्वेक्षण केलं. यात इंजिनीअर्सना ‘जॉब रेडी’ बनवण्यासाठी आवश्यक कौशल्यांतील तफावत भरून काढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कॉलेजांमध्ये प्लेसमेंट विभाग असला, तरीही एक पंचमांशपेक्षा जास्त म्हणजे २४% विद्यार्थ्यांनीच त्याद्वारे नोकरी मिळण्यासाठी ते पात्र असल्याचं सांगितलं. म्हणजे तब्बल ७६% विद्यार्थ्यांकडे सध्या कोणतीही नोकरी नाही. इंजिनीअरिंगच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांकडून हे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सर्वेक्षणानुसार, ३५.४८% नोकरी शोधणारे इंजिनीअर्स वेळेवर नोकरी लागण्याबाबत चिंतेत आहेत. इच्छित पॅकेजपासून ते नोकरीच्या संधींचा स्रोत इथपर्यंत असंख्य विषयांविषयी त्यांना धास्ती आहे. विशेष म्हणजे प्रतिसाद दिलेल्यांपैकी २६.९६% पदवीधारकांनी, त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या बळावर इच्छित पॅकेज मिळवता येईल, असा विश्वासही व्यक्त केला. करोना आणि त्या पार्श्वभूमीवर अंतिम परीक्षा आणि त्यामुळे निर्माण झालेला तिढा सुटण्यास वेळ लागला असल्यानं बहुतांश कंपन्यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल येईपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यायला सांगितली आहे. तर तब्बल १५ टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचा निरोप दिला नसल्यानं कॅम्पस मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमोर नोकरीचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ranjana suryawanshi says

    Job kute ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड