UPSC EPFO परीक्षा लांबणीवर

UPSC EPFO Exam Postponed

UPSC EPFO Exam Postponed – केंद्रीय लोकसेवा आयोगाची ईपीएफओ २०२० परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी होणार होती, पण ती आयोगाने लांबणीवर टाकली आहे. नवी तारीख आयोगाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ईओ / एओ पदासाठी होणारी भरती परीक्षा सध्या स्थगितच ठेवली आहे. ही ईपीएफओ परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार होती, मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध माहिती अशी आहे की, ‘४ ऑक्टोबर २०२० रोजीईपीएफओच्या ईओ / एओ पदांसाठी नियोजित भरती परीक्षा रोजी पुढील सूचना होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.’

यूपीएससीने शुक्रवारी ५ जून रोजी परीक्षांचे सुधारित कॅलेंडर जाहीर केले आहे. नागरी सेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. कॅलेंडरनुसार यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ३१ मे २०२० रोजी घेण्यात येणार होती. परंतु करोना व्हायरस साथीचे वाढते संक्रमण आणि त्यामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. नागरी सेवा मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येईल. कोविड -१९ साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस (मुख्य) परीक्षा २०१९ च्या मुलाखती २० जुलैपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. आयोगाने कळवले आहे की सिव्हिल सर्व्हिसेस (मुख्य) परीक्षा २०१९ ची पर्सनॅलिटी टेस्ट (मुलाखत) २० जुलै, २०२० पासून पुन्हा सुरू होईल आणि उमेदवारांना यासंदर्भात वैयक्तिक माहिती दिली जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड