सेव्हन हिल्स रुग्णालयात मोठी भरती- अनेक रिक्त पद
Sevenhills hospital Recruitment 2020
Sevenhills hospital Recruitment 2020 – सध्या आरोग्य क्षेत्रात कोविड- १९ मुळे नोकऱ्यांच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. इतक्या की नामांकित रुग्णालये समोरून ऑफर देऊनही डॉक्टर्स, नर्सेस मिळेनासे झाले आहेत. मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात तब्बल ६०० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र ही पदे भरली जात नसल्याने आता जास्त पगाराची ऑफरही रुग्णालयाने दिली आहे. या संधीचा इच्छुकांनी नक्कीच लाभ घ्यावा.
सेव्हन हिल्स रुग्णालयात तब्बल १,००४ बेड्स कोविड -१९ रुग्णांसाठी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य कर्मचारीही तितक्याच मोठ्या संख्येने हवे आहेत. मात्र महाराष्ट्रातून ही गरज भागत नसल्याने आता रुग्णालयाने देशपातळीवर शोधमोहिम सुरू केली आहे. रुग्णालयाच्या जाहिरातीनुसार, १०० इंटेन्सिविस्ट्स, १०० अनेस्थेटिक्स, १० नेफ्रॉलॉजिस्ट्स, ५ रेडिओलॉजिस्ट, २०० MBBS डॉक्टर्स, १०० BAMS आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स, १०० BHMS आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स हवे आहेत.
सध्या या रुग्णालयात १७६ डॉक्टर्स आहेत आणि आणखी ६०० डॉक्टर्सची रुग्णालयाला आवश्यकता आहे. त्यामुळे रुग्णालय नेहमीच्या वेतनापेक्षा जास्त वेतन ऑफर करत आहेत. एमडींना दरमहा २ लाख, एमबीबीएसना दरमहा ८० हजार, आयुर्वेदिक डॉक्टरांना ६० हजार तर होमिओपॅथ्सना ५० हजार रुपये दरमहा पगाराची ऑफर आहे. याशिवाय बोर्डिंग, लॉजिंग, महिन्यातील १५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी आदी अतिरिक्त लाभही देण्यात येत आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सध्या असलेल्या रिक्त पदांची माहिती
- इंटेन्सिविस्ट्स – १००
- ऍनेस्थेटिक – १००
- नेफ्रॉलॉजिस्ट्स – १०
- रेडिओलॉजिस्ट – ५
- एमबीबीएस डॉक्टर्स – २००
- बीएएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स – १०० ,
- बीएचएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स – १००
Is there Pharmasist vacancy ?
Me Dhms cch Dr aahe expriancse 15yr cha me apply.karu shakto ka
Mi gavala ahe …jalgaon la tar mi aplay karu shakto ka