BMC वार्ड बॉय भरती २०२०

BMC Ward Boy Recruitment 2020

BMC Ward Boy Recruitment 2020 – कोव्हिड महामारीच्या काळात मनुष्यबळ अपुरे पडू नये म्हणून वादग्रस्त ठरलेल्या कामगार भरतीतील यादीतून महापालिका कामगारांची नियुक्ती करणार आहे. परंतु 2017 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतील फक्त खुल्या प्रवर्गातील 511 पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.

कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरू होताच मुंबई महापालिकेने वॉर्डबॉय पदासाठी अर्ज मागवले होते. आता कामगार भरतीची प्रक्रिया पूर्ण करणे शक्‍य नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे 2017 मध्ये कामगारांच्या भरतीसाठी मागवलेल्या अर्जांतून 1388 उमेदवारांची पहिली यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याने भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता नवी भरती करण्यास वेळ नसल्यामुळे या यादीतील खुल्या प्रवर्गातील 511 जणांची कामगार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये वॉर्डबॉयच्या 200 जागा रिक्त आहेत.त्यातील सर्व प्रकारची आरक्षणे वगळून 146 जागा भरण्यात येतील.ही भरती 2017 मधील पात्र उमेदवारांमधून करण्यात येणार आहे.साथीच्या काळात अधिक वॉर्डबॉयची गरज असल्यामुळे इतर विभागांतील 500 कामगारांच्या जागांपैकी खुल्या प्रवर्गातील 365 उमेदवारांची भरती करून वॉर्डबॉय म्हणून तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.त्यानंतरच्या उमेदवारांची भरती सामाजिक आणि समांतर आरक्षणांनुसार करण्यात येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BMC ward boy result


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Kiran shankar Sawant says

    Ward bharti ky zhal

  2. Vitthal kharat says

    114 ward boy bharti 2020 ch ky zal.tyacha reault lagnar ki fakt 2017 madhun ch bharti kernar.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड