रेल्वे NTPC 2025 परीक्षा येत्या जूनमध्ये होणार, प्रवेशपत्र, हॉल तिकीट अपडेट! | RRB NTPC Exam 2025 Hall Ticket Download
RRB NTPC Exam 2025 Admit Card Download
मित्रांनो, आपल्या पैकी अनेक जणांनी RRB NTPC चे अर्ज भरले असतील. साहजिकच आता आपल्याला या परीक्षेच्या प्रवेशपत्राची आणि अपडेट्सच्या प्रतीक्षा असेल. यासाठीच आम्ही एक महत्वाची बातमी समोर घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, भारतीय रेल्वेने घेतलेल्या सर्वात मोठ्या भरती मोहिमेपैकी एक – RRB NTPC 2025 ची पहिली संगणकाधारित परीक्षा (CBT-1) येत्या जून 2025 मध्ये होणार आहे. यामध्ये 1.21 कोटींहून अधिक उमेदवार सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. ही परीक्षा पदवीधर व पदवीपूर्व (undergraduate) उमेदवारांसाठी आहे. एकूण 11,558 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. हि परीक्षा पुढील महिन्यात ह्मणजेच जून २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.चाल तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया..
हॉल तिकीट व शहर माहिती लवकरच
उमेदवारांना परीक्षा होण्याच्या १० दिवस आधी शहर माहिती पत्रक (city intimation slip) मिळेल आणि ४ दिवस आधी अधिकृत प्रवेशपत्र (admit card) उपलब्ध होईल. उमेदवारांनी rrbcdg.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले नोंदणी क्रमांक व संकेतशब्द वापरून लॉग इन करून ते डाउनलोड करावे लागेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तीन शिफ्टमध्ये परीक्षा – वेळ ठरवून तयारी करा
परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहे:
- पहिली शिफ्ट: सकाळी ९:०० ते १०:३० (रिपोर्टिंग वेळ: ७:३०)
- दुसरी शिफ्ट: दुपारी १२:४५ ते २:१५ (रिपोर्टिंग वेळ: ११:१५)
- तिसरी शिफ्ट: संध्याकाळी ४:३० ते ६:०० (रिपोर्टिंग वेळ: ३:००)
उमेदवारांनी वेळेआधी केंद्रावर पोहचणे अत्यंत गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावरची काटेकोर तपासणी लक्षात घेता, वेळ व्यवस्थापन महत्त्वाचे ठरेल.
परीक्षा नमुना – काय विचारले जाईल?
CBT-1 मध्ये एकूण १०० प्रश्न असतील, आणि एकूण वेळ ९० मिनिटे असेल.
विभागवार प्रश्नसंख्या पुढीलप्रमाणे:
- सामान्य ज्ञान: ४० प्रश्न
- गणित: ३० प्रश्न
- तर्कशक्ती आणि सामान्य बुद्धिमत्ता: ३० प्रश्न
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल, मात्र चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केला जाईल. त्यामुळे अचूकतेसह उत्तर देणे खूप महत्त्वाचे आहे.
भरती प्रक्रिया – टप्प्याटप्प्याने मूल्यांकन
CBT-1 नंतर पात्र उमेदवारांना CBT-2 (मुख्य परीक्षा) साठी बोलावले जाईल. त्यानंतर काही पदांसाठी कौशल्य चाचणी किंवा टायपिंग टेस्ट घेतली जाईल. अंतिम टप्प्यात मूल्यांकन कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी होईल. ही प्रक्रिया पार केल्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड होईल.
तयारीसाठी महत्त्वाचे मुद्दे
उमेदवारांनी पूर्वीच्या वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, टाईम मॅनेजमेंट व बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा यावर भर द्यावा. अधिकृत RRB वेबसाइटवरील अधिसूचना नियमितपणे तपासत राहणे आवश्यक आहे. तसेच, नकारात्मक गुण प्रणाली लक्षात ठेवून योग्य रणनीती तयार करावी.
इतकी मोठी स्पर्धा – योग्य तयारीच यश देईल!
या परीक्षेसाठी एकट्या सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 मध्येच 1.21 कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले. ही संख्या पाहता स्पर्धा प्रचंड आहे. पदवीधरांसाठी 8,113 जागा आणि पदवीपूर्व उमेदवारांसाठी 3,445 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य दिशेने व सातत्याने अभ्यास करणाऱ्यांसाठीच यश शक्य आहे.
अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती मिळवा
RRB NTPC 2025 संबंधित सर्व माहिती, प्रवेशपत्रे व परीक्षेचे अपडेट्स तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच rrbcdg.gov.in मिळतील.