10th Result CBSE Board: सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. २६ हजार ६७५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण २३ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी २२ लाख २१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाचा निकाल ९३.६६ टक्के लागला आहे. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक ९९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल सीबीएसईच्या वेबसाईटवर पाहता येईल. तसेच, डिजिलॉकरवर मार्कशीट डाउनलोड करता येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
निकाल पाहण्यासाठी तुम्हाला results.cbse.gov.in, www.cbse.gov.in, www.cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर भेट द्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर, जन्मतारीख, कॅप्चा कोड आणि इतर तपशील टाकून निकाल तपासता येईल. एकूण जवळपास ४४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे.
|
सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ते आता निकाल पाहू शकतात. परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली. 13 मे रोजी बोर्डाने निकाल जाहीर केला. यंदा 93.66 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक विद्यार्थी पास झाले आहेत. निकाल कसा पाहायचा आणि मार्कशीट कशी डाउनलोड करायची, याची माहिती या लेखात आहे.
सीबीएसई बोर्डाने बारावीच्या पाठोपाठ आता दहावीचा निकालही जाहीर केला आहे. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून निकालाची वाट पाहिली, त्यांना आज निकाल पाहता आला. सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या काळात झाली. आज 13 मे रोजी सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लागला आहे.
एसएमएसने निकाल तपासण्याची पद्धत
जर इंटरनेट किंवा वेबसाइट बंद असेल, तर विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे SMS सेवा वापरू शकता:
- तुमच्या फोनमधील SMS अॅप उघडा
- टाईप करा: CBSE10 <Roll Number> किंवा CBSE12 <Roll Number>
- हे SMS 7738299899 या क्रमांकावर पाठवा
- काही क्षणांत तुमचा निकाल मेसेजमध्ये प्राप्त होईल
CBSE मार्कशीटमध्ये कोणती माहिती असेल?
तुमच्या १०वी व १२वीच्या CBSE Marksheet 2025 मध्ये खालील माहिती समाविष्ट असेल:
- विद्यार्थी नाव, पालकांचे नाव
- रोल नंबर आणि जन्मतारीख
- विषयांची नावे व कोड
- गुण, टक्केवारी, ग्रेड्स
- परीक्षा वर्ष व निकालाची स्थिती
- महत्त्वाच्या सूचना आणि विषयानुसार गुण
यंदा 26 हजार 675 शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यासाठी 7 हजार 837 परीक्षा केंद्र होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढली होती. दहावीच्या परीक्षेसाठी 23 लाख 85 हजार 79 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23 लाख 71 हजार 939 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 22 लाख 21 हजार 636 विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 93.66 टक्के लागला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















