महत्वाचा अपडेट! आत्ता लाडकी बहिणींचा एप्रिलच्या हफ्त्याची तारीख जाहीर! |Ladki Bahin April Payment Date OUT

Ladki Bahin April Payment Date OUT

आज सरकार द्वारे राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आणली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल २०२५ महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार (Ladki Bahin April Payment Date OUT )  असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात दहावा हप्ता जमा होईल,” आणि योजनेच्या बंद होण्याबाबत अफवांना पूर्णविराम दिला आहे. चला तर जाणून घेऊया या बद्दल पूर्ण तपशीलवार माहिती.

Ladki Bahin April Payment Date

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात महिलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये थेट जमा केले जातात. परंतु मागील काही दिवसांत या योजनेच्या भविष्याबाबत अनेक विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या पार्श्वभूमीवर, छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की, “शासनाचे पैसे कुठेही जाणार नाहीत, ते निश्चितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील.” त्यांनी सांगितले की काही वेळा आर्थिक प्रक्रियेतील विलंबामुळे थोडासा उशीर होतो, मात्र योजनेच्या बंद होण्याची भीती निराधार आहे.

भुजबळ यांनी ही तुलना घरगुती खर्चाशी केली. “आपली कमाई ठरलेली असते. एखाद्या महिन्यात मोठा खर्च झाला, तर इतर खर्च थोडे मागे पडतात. पण त्याचा अर्थ असा नाही की, सगळंच थांबेल,” असं उदाहरण देत त्यांनी राज्य सरकारचा खर्च कसा कार्यान्वित होतो हे समजावून सांगितलं. एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी अनेक महिलांनी बँक खात्याची स्थिती तपासण्यास सुरुवात केली होती. अनेकजणी सोशल मीडियावर यासंबंधी प्रश्न उपस्थित करत होत्या. यावर अखेर मंत्री भुजबळ यांनी अधिकृतपणे उत्तर दिलं आणि “हप्ता येणारच आहे, आणि तोही अक्षय तृतीयेला,” अशी खात्री दिली.

याच कार्यक्रमात भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकांचं नुकसान झालं आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे आणि पंचनामे सुरू झाले आहेत. सरकार शेतकऱ्यांना नक्कीच मदत करेल.” थोडक्यात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यात अक्षय तृतीयेला जमा होईल, हे आता स्पष्ट झालं आहे. महिलांनी घाबरून न जाता थोडी प्रतीक्षा करावी, कारण शासन आपली जबाबदारी पार पाडणारच आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड