सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही! – No action can be taken against those who post on social media

No action can be taken against those who post on social media

 माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (अ) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याने सवर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे यापुढे सोशल माध्यमांवर व्यक्त होणाऱ्यांवर पोलिसांना कलम (६६) ‘अ’ नुसार कारवाई करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायम राहणार आहे. सोशल माध्यमांवर व्यक्त होणे हा गुन्हा ठरत नाही. सर्वोच्य न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात लावता येणार नाही, तसेच अटकही करता येणार नाही.

No action can be taken against those who post on social media

फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल माध्यमांवर कोणतीही पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ नुसार त्यांच्यावर कारवाई केली जात होती. याप्रकरणी एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आयटी कायद्यातील कलम ६६ ‘अ’ आव्हान दिले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत विधी आयोगाचे सदस्य अॅड. विजय सावंत यांनी माहिती दिली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे कलम नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा निष्कर्ष नोंदविला. सोशल माध्यमांवर मत मांडणाऱ्या काही नागरिकांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ नुसार पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार होता. हे कलम स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या कलम १९(१) ‘अ’चे उल्लंघन करणारे असल्याचे सर्वोच्य न्यायालयाने नमूद केले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड