एमएचटी-सीईटी साठी साडेआठ लाखांवर नोंदणी-करेक्शन विंडो ओपन!! – 8.5 lakh Registrations in MHT-CET Registration!!
8.5 lakh Registrations in MHT-CET Registration!!
महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) 2025 साठी नोंदणी केलेले उमेदवार आजपासून (10 मार्च 2025) करेक्शन विंडोच्या माध्यमातून आपल्या अर्जामध्ये काही मर्यादित बदल करू शकतात. हा एक महत्वाचा अपडेट विभागातर्फे सादर करण्यात आला आहे. तरी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी आवश्यकतेनुसार आपल्या अर्जात बदल करावेत. तसेच मित्रांनो, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र यांच्या वतीने उमेदवारांसाठी करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे. उमेदवार 10 मार्च ते 12 मार्च 2025 या कालावधीत आपल्या अर्जामध्ये बदल करू शकतात. फॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जावे. PCM आणि PCB गटांच्या अंतर्गत अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध असल्याबद्दल कक्षाने एक सूचना जाहीर केली आहे. तांत्रिक शिक्षण आणि कृषी शिक्षण विभागाच्या अंतर्गत MHT CET 2025 साठी नोंदणी पूर्ण केलेले उमेदवार (जर त्यांना गरज असेल तर) आपल्या अर्जामध्ये सुधारणा करू शकतात.
एमएचटी-सीईटी परीक्षा दोन गटांमध्ये घेतली जाते: पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) आणि पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र). अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पीसीएम गटाची परीक्षा आवश्यक आहे, तर फार्मसी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पीसीबी गटाची परीक्षा आवश्यक आहे.
परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु ती एप्रिल-मे २०२५ दरम्यान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत माहिती पाहावी.नोंदणी प्रक्रियेत, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार आवश्यक कागदपत्रांची माहिती अर्ज भरतानाच उपलब्ध होईल, ज्यामुळे कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवावी, ज्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत. एमएचटी-सीईटी २०२५ परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://cetcell.mahacet.org/) जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. नोंदणीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२५ आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावा.