महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ अर्थात टीएआयटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत सुमारे दोन लाख ३६ हजार ५९१ उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु, दुबार अर्ज, शुल्क न भरलेले वगळून दोन लाख २७ हजार २२९ उमेदवारांचे अर्ज अंतिम केले आहेत. संबंधित उमेदवारांबी परीक्षा २७ मे ते १० जूनदरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी अर्थात टीएआयटी परीक्षा २७मे ते १० जूनदरम्यान घेण्याचे नियोजित आहे. परंतु, परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी १४ मे पर्यंत मुदत दिली होती. शासन आदेशानुसार डी. एड, बी. एड. आणि एम. एड. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवारदेखील परीक्षेस पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी प्राप्त झाली आहे.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यादृष्टीने टीएआयटी परीक्षा आवश्यक आहे. या परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी देण्यात येते. ज्या उमेदवारांच्या स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षा असल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून माहिती संकलित केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांच्या तारखा विचारात घेऊन टीएआयटी परीक्षेची तारीख दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही परीक्षांची आकडेवारी पाहता यंदा थोडा कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भाने पुण्यातील राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना निवेदनही पाठवण्यात आल्याची माहिती युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी येथे दिली. परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचनेची माहिती दिल्यानंतर अवघ्या २० दिवसांत टेट-३ या परीक्षेची पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागत असून, तयारीसाठी कमी कालावधी मिळाल्याचाही सूर उमटत आहे. टेटच्या तारखेचे नियोजन केल्यास भविष्यातील न्यायालयीन प्रक्रियेत जाण्यासारखी समस्या उद्भवणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.
TAIT Exam Registration Process – Many candidates are facing problems while TAIT Application Form registration process. In Candidates Dashboard there is no options to Edit the details, So candidates are facing the problem after submitting details & Fees payment. More details are given below. Also the Tait website ibpsonline.ibps.in/mscepjan23 working very slow or Not working many times.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















