खुशखबर, बार्टीचा नवीन AI प्रमाणपत्र कोर्स करा, सोबत मिळणार स्टायपेंड सुद्धा !!! – BARTI to Launch AI Certificate Course!!

‘BARTI’ to Launch AI Certificate Course!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने राज्यातील अनुसूचित जातींमधील युवक-युवतींसाठी अडीच महिन्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रमाणपत्र कोर्स राबविण्यात येणार आहे.

‘BARTI’ to Launch AI Certificate Course!!

रोजगारक्षम शिक्षणाची संधी
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने तरुणांना रोजगारक्षम शिक्षण घेणे आवश्यक झाले आहे. ही गरज लक्षात घेऊन बार्टीने एआय प्रमाणपत्र प्रशिक्षण कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कोर्समुळे विद्यार्थी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह इतर विभागांमध्येही रोजगार मिळवू शकतील.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण आणि संधी
अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत राहण्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांची कौशल्ये विकसित होतील.

कोर्सची वैशिष्ट्ये:
२५० विद्यार्थ्यांना प्रवेश
१८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध
गुणवत्तेच्या निकषांवर पात्र अर्जांची छाननी
निवड प्रक्रियेसाठी परीक्षा किंवा मुलाखत
पात्र उमेदवारांची यादी बार्टीच्या संकेतस्थळावर प्रकाशित
विद्यार्थ्यांना दरमहा ४,००० रुपये विद्यावेतन

या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार केंद्रे:
हा कोर्स छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, परभणी, पुणे, सोलापूर, लातूर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, धुळे, सांगली यांसह विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

बार्टीच्या या उपक्रमामुळे अनेक युवकांना भविष्य घडविण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड