बदनापूर येथील नगरपंचायतीत तब्बल सोळा पदे रिक्त, भरतीच झाली नाही! – Badnapur Nagar Panchayat Bharti 2025

Badnapur Nagar Panchayat Bharti 2025

येथील नगरपंचायत अस्तित्वात येऊन दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, नगरपंचायत कार्यालयाला आवश्यक असलेल्या मंजूर पदांपैकी अनेक पदे भरली गेली नाहीत. मंजूर पदांपैकी तब्बल १६ पदे रिक्त आहेत. एकूणच कार्यालयात सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे. शिवाय सामान्य नागरिकांची कामे देखील खोळंबत आहेत.आस्थापनेतील लिपिक टंकलेखकाचे मंजूर असलेली सातच्या सात पदे रिक्त आहेत. गाळणी चालक-प्रयोगशाळा सहायक पदाचे एक पद मंजूर असून तेही रिक्त आहे. पंप ऑपरेटर-वीजतंत्र-जोडारी या संवर्गातील मंजूर असलेली तीनही पदे रिक्त आहेत.

badnapur nagar panchayat bharti

 

तर, संवर्गातील महाराष्ट्र नगर परिषद जलदाय मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा या विभागातील मंजूर असलेले एकमेव पद देखील रिक्त आहे. महाराष्ट्र नगर परिषद नगर रचनाकार आणि विकास सेवेतील मंजूर असलेले पद रिक्त आहे. विशेष म्हणजे स्वच्छता निरीक्षकांची दोन्ही पदे रिक्त आहेत. अशी एकूण १६ पदे रिक्त आहेत. शिवाय बांधकाम, पाणीपुरवठा, अग्निशमन दल आदी विभागांसाठी आगाऊ कर्मचाऱ्यांची आवश्यकता देखील आहे. मात्र, जिथे मंजूर पदेच रिक्त आहेत, तेथे नवीन पदे कधी मंजूर होतील, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली. एकूणच बदनापूर नगरपंचायतीच्या रिक्त पदांच्या ग्रहणामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. शासनाने बदनापूरला नगरपंचायतीचा दर्जा दिला मात्र आवश्यक कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे कामात व्यवस्थितपणा आणि गतिशीलता आणण्यासाठी सर्वच पदे भरण्याची गरज आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड