आता तिसरी ते बारावीपर्यंत मराठी अनिवार्य! – राज्य अभ्यासक्रम आराखड्याबाबत तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

Marathi Compulsory 3rd to 12th

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात पहिलीपासून हिंदी अनिवार्य केल्याची ओरड निरर्थक असून, प्रत्यक्षात या आराखड्यानुसार तिसरी ते बारावीपर्यंत राज्यातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेत मराठी अनिवार्य आहे. पहिली भाषा कन्नड, उर्दू, गुजराती असली, तरीही दुसरी भाषा इंग्रजी आणि तिसरी भाषा मराठीच असावी लागेल.

Maharashtra SSC Result 2024

 

राज्य अभ्यासक्रम आराखडा- समज आणि गैरसमज’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत हा आराखडा आखण्यात सक्रिय भूमिका बजावलेल्या शिक्षणतज्ज्ञांनी विविध विषयांबाबत सखोल चर्चा केली. आराखड्यातील तरतुदी, त्यांची व्याप्ती आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यात येऊ शकणाऱ्या अडचणी, यांबाबत या परिषदेत साधकबाधक चर्चा झाली. ‘CBSE’च्या धर्तीवर अभ्यासक्रम, ‘CBSE’ प्रमाणे शाळांचे वेळापत्रक, हिंदी भाषेला प्राधान्य, गणित-विज्ञान विषयांबाबत ‘मवाळ’ भूमिका, अशा विविध मुद्द्यांमुळे राज्य अभ्यासक्रम आराखड्याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात अनेक गैरसमज पसरले आहेत.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

हा आराखडा तयार करण्यासाठीच्या सुकाणू समितीचे सदस्य श्रीपाद ढेकणे, रमेश देशपांडे, भाषा समितीच्या सदस्या कांचन वाटवे-जोशी, शालेय संस्कृती समितीचे सदस्य जगदीश इंदलकर, शिक्षणतज्ज्ञ सुदाम कुंभार, संस्थाचालकांचे प्रतिनिधी सुरेंद्र दिघे, निवृत्त महापालिका शिक्षिका लतिका सोमण आणि पालक प्रतिनिधी निखिल रावळ यांनी या परिषदेत सहभाग घेतला. या आराखड्यात पहिलीपासून हिंदी भाषेचे शिक्षण अनिवार्य केले आहे, मराठीकडे दुर्लक्ष झाले आहे, असे अनेक गैरसमज पसरले आहेत. खरे तर या आराखड्यात आपण राज्यातील सर्वच भाषांच्या शाळांमध्ये इयत्ता बारावीपर्यंत मराठी हा विषय अनिवार्य केला आहे, असे श्रीपाद ढेकणे यांनी स्पष्ट केले. कांचन वाटवे-जोशी यांनीही हाच मुद्दा विस्ताराने सांगत हिंदी ही तिसरी भाषा असून ती प्रस्तावित आहे. त्या जागी आणखीही काही भाषांचे पर्याय भाषाविषयक समितीने दिले होते. त्याचा अंतिम निर्णय अद्यापही झालेला नाही, हे नमूद केले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड