विद्यार्थ्यांना दिलासा ! जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे आजपासून विशेष मोहीम – Caste Validity Certificate Maharashtra
caste validity certificate Maharashtra
Caste Validity Certificate Maharashtra Update
caste validity certificate Maharashtra: जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे आजपासून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश जात वैधता प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेला वेग देणे व शैक्षणिक तसेच रोजगाराच्या संधीसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांना व उमेदवारांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे हा आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समितीने तातडीने पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामध्ये अर्जदारांच्या प्रमाणपत्रांची व आवश्यक दस्तावेजांची तपासणी जलदगतीने पूर्ण केली जाईल. या प्रक्रियेमुळे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणार्या उमेदवारांना त्यांच्या प्रवेश प्रक्रियेत सुविधा मिळेल, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यास मदत होईल.
ही मोहीम पुढील काही आठवडे चालेल, व यासाठी अर्जदारांना त्यांच्या नजीकच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात भेट देऊन, आवश्यक दस्तावेजांसह आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तूशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत १४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विशेष त्रुटी पूर्तता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एसईबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थी तसेच ज्यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदारस्तरावर प्रलंबित आहेत.
Cast validity Certificate 6 Month Extension
caste validity certificate Maharashtra: सध्या अभियांत्रिकीसह सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज हजारो विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रासाठी (व्हॅलिडीटी) अर्ज करीत आहेत. पण, ३६ पैकी २३ जात पडताळणी समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने ‘व्हॅलिडीटी’साठी विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ, सहा महिन्यांचा कालावधी मिळणार |
विधिमंडळाने २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण अधिनियम-२०२४ (एसईबीसी आरक्षण अधिनियम २०२४) एकमताने मंजूर केला आहे. २६ फेब्रुवारीपासून हा अधिनियम अमलात आला आहे. अधिनियमाच्या कलम पाचनुसार सामाजिक मागासवर्गीयांसाठी शैक्षणिकदृष्ट्या राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीत दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित प्रवर्गाला जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेअर’ प्रमाणपत्रे दिली जात आहेत. राज्यात सुरू विविध दरम्यान, सध्या असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. अंतिम प्रवेश घेताना विद्यार्थ्यांला जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. विविध अडचणींमुळे विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने सरकारने हा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे.
सहा महिन्यांत प्रमाणपत्र देण्याचे बंधन
■ राज्यातील ३६ पैकी अवघ्या १३ जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांनाच पूर्णवेळ अध्यक्ष आहेत. मोफत प्रवेशामुळे ‘व्हॅलिडोटी ‘साठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कार्यालयात मुलींच्या रांगा लागल्याचीही वस्तुस्थिती समोर आणली होती. या वृत्ताची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्याध्यर्थ्यांना ‘व्हॅलिडीटी’ सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर करण्याचे बंधन घालण्यात आहे
Caste validity certificate Maharashtra – After the results of class 10 and 12, students are looking forward to admission to higher education. Students and parents are engaged for these admissions and for the purpose of obtaining various reservations and concessions. However, Caste Validity Certificate Maharashtra due to the simultaneous rush to get various certificates from the government, it is often not possible for the government to fulfill the certificates for all the students. However, now, through ‘Sarkar Apne Dari’, students are getting certificates even in the shortest possible days. There are two portals, castevalidity.mahaonline.gov.in & bartievalidity.maharashtra.gov.in.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकलानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचे वेध लागतात. या प्रवेशांसाठी आणि त्यातील विविध आरक्षण आणि सवलती मिळवण्याच्या हेतूने विद्यार्थी आणि पालकांची जुळवाजुळव सुरु होते. पण, शासनाकडून विविध प्रमाणपत्र मिळवणायसाठी एकाचवेळी उडणार्या गर्दीमुळे अनेकदा सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांची पूर्तता करणे शासनालाही शक्य होत नाही. मात्र, आता ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमीत-कमी दिवसांमध्ये अगदी त्वरीतही दाखले मिळत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दुसरीकडे आता जात पडताळणी कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात तर अधिकाधिक आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे. विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता, जात वैधता प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आता विद्यार्थी बार्टीच्या वेबसाईटला भेट देऊन जात वैधता प्रमाणपत्रकरिता अर्ज करू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याकडे शाळेचा पुरावा नसेल तरी असे विद्यार्थी आता उत्पन्नाचा पुरावा सादर करून बार्टीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित समिती आठ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. एवढेच नव्हे तर, एखाद्या विद्यार्थ्याला जर खूपच गरज असेल तर एका दिवसात देखील समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.
याकरिता समितीने माहिती देताना सांगितले आहे की, “विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्या कॉलेजमध्ये नाव नोंदणी करून कॉलेजमधील जे काही कागदपत्रे आवश्यक आहेत ते कागदपत्र घेऊन समितीकडे जाऊन जात वैधता प्रमाणपत्र करिता ताबडतोब अर्ज करणे गरजेचे आहे. या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार नाही किंवा तो नाकारला जाणार नाही याची काळजी समितीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.
अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक : List Of Documents Required For Cast Validity
१. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड पाहिजे.
२. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असल्यास, त्या कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेटसह अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्याची सही-शिक्का व अर्जदाराचा फोटो असणे गरजेचे आहे.
३. तसेच, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा, जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला आणि वडील जर शिकलेले नसतील तर तसे शपथपत्र असणे गरजेचे आहे.
४. त्यासोबतच, अर्जदाराची आत्या व काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराच्या आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच गाव
कर पावती, खरेदीखत, फेरफार उतारा, गहाण खत आणि मालमत्ता पत्रक इत्यादी महसुली पुरावे जोडणे गरजेचे असते.
५. शिवाय, महत्त्वाचे म्हणजे वंशावळ नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व यासाठी आवश्यक फॉर्म नंबर १७ ( शपथपत्र) इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे :
जात वैधता प्रमाणपत्रासाठी SC संवर्गातील विद्यार्थ्याने १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक असणार आहे.
VJNT तील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचे पुरावे जोडने बंधनकारक असेल.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी OBC व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना १३ ऑगस्ट १९६७ पूर्वीचे पुरावे जोडणे बंधनकारक राहील.
Table of Contents
माझ्या व वडिलांच्या आडनावात काही शब्दांचा फरक आहे चालेल का?
काही अडचण नाही येणार ना