कृषी खात्यात नऊ हजार पदे रिक्त, नवीन पदभरतीची प्रक्रिया लवकरच होणार सुरु! – 9,000 Vacancies in Agriculture Department!!
9,000 Vacancies in Agriculture Department!!
सध्या महाराष्ट्र विविध विभागात अनेक पदे रिक्त आहे. यात एक महत्वाचा विभाग म्हणजे कृषी विभाग! या विभागात तब्बल ९ हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समजते. या मुळे या विभागातील भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याची मागणी सर्व स्तरावरून जोर पकडत आहे. यातच, कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोष दिला जात असताना, गेल्या काही वर्षांपासून तब्बल ९,१३३ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या रिक्त पदांबाबत प्रशासन गंभीर नसल्याने ही भरती कधी होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तरी प्राप्त माहिती नुसार या विभाग भरती प्रक्रिया राज्य सरकार लवकरच राबू शकते असे संकेत आहे. कारण राज्यातील विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु होणार आहेत. त्या नुसार कृषी विभागाचा नंबर सुद्धा लवकरच लागू शकतो.
राज्यात कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध आस्थापनांमध्ये एकूण २७,५०२ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या फक्त १८,३६९ कर्मचारी कार्यरत असून, उर्वरित ९,१३३ पदे रिक्त आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात असलेल्या ‘गट-क’मधील सर्वाधिक ५,५६५ पदे रिक्त आहेत. यामध्ये कृषी पर्यवेक्षक (७३), कृषी सहायक (१,६९३), अधीक्षक (५८), लिपिक, टंकलेखक, अनुरेखक आणि वाहनचालक यांचा समावेश आहे. तसेच, ‘गट-ड’मध्ये नाईक, शिपाई (१,९८९), क्लीनर, माळी (५५९), प्रशिक्षित मजूर (२९९), मदतनीस आणि परिचर यांचीही वाणवा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गंभीर बाब म्हणजे, डिसेंबर २०२४ पर्यंत राज्याचे कृषी आयुक्त पद रिक्त होते. जानेवारीत सूरज मांढरे यांची कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, अद्यापही संचालक आणि सहसंचालकांसह महत्त्वाची पाच पदे रिक्त आहेत. याशिवाय, प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी आणि कृषी अभियंता पदे न भरल्याने कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
कृषी खात्यातील रिक्त पदांमुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या येत आहेत, परिणामी, योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत आहे. माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि धनंजय मुंडे यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. तर, सध्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विभागनिहाय बैठका घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे. मात्र, भरती प्रक्रिया विलंबामुळे कृषी विभागातील प्रशासकीय कार्यप्रणाली ठप्प झाली आहे.
सरकार, ही रिक्त पदे कधी भरणार?
रिक्त पदांची यादी:
- संचालक – १, कृषी सहसंचालक – ४, अधीक्षक कृषी अधिकारी – ९, प्रशासकीय अधिकारी – ३, लेखा अधिकारी – ११, कृषी अधिकारी – ३९८, कृषी कनिष्ठ अभियंता – ८
- कृषी पर्यवेक्षक – ७३, कृषी सहायक – १,६९३, अधीक्षक – १६, सहायक अधीक्षक – ४२, वरिष्ठ लिपिक – १३१, लिपिक/टंकलेखक – १,०९१, आरेखक – ३४, अनुरेखक – १,९००
- सहायक ग्रंथपाल – १, लघुलेखक (उच्चश्रेणी) – ८, लघुलेखक (निम्नश्रेणी) – ५२, लघुटंकलेखक – ५२, वाहनचालक – ४७१, टिलर ऑपरेटर – १५
- नाईक/दप्तरी – ७२, शिपाई/रखवालदार – १,९८९, क्लीनर – १३, माळी/रोपमळा मदतनीस – ५५९, प्रशिक्षित मजूर – २९९, प्रयोगशाळा सहायक/परिचर – २१
सरकारने तातडीने या पदांची भरती प्रक्रिया राबवावी, अशी शेतकरी व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मागणी केली जात आहे.