तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील १५ हजार ४९१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांच्या घरभाडे भत्ता फरकाची थकबाकी मिळणार आहे. शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी यासाठी शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. जुलै २०२१ पासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात २४ टक्क्यांवरून २७ टक्के वाढ करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२१पासून वाढीव दराने भत्ता देण्यात आला; मात्र जुलै ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील फरक शिक्षकांना मिळाला नव्हता. इतर शासकीय कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळाल्यानंतर शिक्षकांनाही ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या संदर्भात शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालकांकडे वारंवार निवेदने देण्यात आली. तत्कालीन शिक्षण संचालकांनी ९ मार्च २०२३च्या आदेशानुसार विभागनिहाय थकबाकीचा आढावा घेऊन प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शालार्थ प्रणालीमध्ये ‘टीए एरिअर्स’ टॅब उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता संबंधित आदेश जारी झाल्याने थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील ७७२ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ८ हजार, पालघरमधील २५८ संस्थांतील २ हजार ८०८, तर रायगडमधील ६८३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४ हजार ६८३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष संपत गीते, सुभाष अंभोरे, विजय धनवडे, अवधूत चव्हाण, सुनील सानप आणि सचिन पांडे यांनी दिली.
8th pay commission salary slab – सध्या सर्व शिक्षकांना संभ्रम आहे कि आपली नेमकी पगारवाढ किती होणार आहे! देशभरातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये सध्या ‘८ वा वेतन आयोग’ हा चर्चेचा मुख्य विषय बनलाय. विविध मंत्रालये, विभाग आणि कर्मचारी संघटनांकडून सूचना व माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, शिक्षक संघटनांनी वेतन रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्याची मागणी केलीय. सध्या ‘एन्ट्री-लेव्हल ६’ शिक्षकांचे सुरुवातीचे मूळ वेतन थेट १,३४,५०० रुपये निश्चित करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सर्वाधिक चर्चेत आहे. ८ व्या वेतन आयोगांतर्गत ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढवण्याची मागणी ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या काळात हा फॅक्टर २.५७ इतका होता, तर आता तो २.८६ ते ३ च्या दरम्यान वाढवण्याची मागणी केली जातेय. जर ही मागणी मान्य झाली तर मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. विविध अंदाजानुसार ‘फिटमेंट फॅक्टर’ २.२८ ते २.८६ च्या दरम्यान असू शकतो, ज्यामुळे किमान वेतन ४१,००० ते ₹५१,००० च्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. चला तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया..

८ व्या वेतन आयोगांतर्गत ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढवण्याची मागणी ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या काळात हा फॅक्टर २.५७ इतका होता, तर आता तो २.८६ ते ३ च्या दरम्यान वाढवण्याची मागणी केली जातेय. जर ही मागणी मान्य झाली तर मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. विविध अंदाजानुसार ‘फिटमेंट फॅक्टर’ २.२८ ते २.८६ च्या दरम्यान असू शकतो, ज्यामुळे किमान वेतन ४१,००० ते ₹५१,००० च्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे.
केवळ वेतनवाढच नाहीतर घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ करण्याची मागणी केली जातेय. मोठ्या शहरांमधील वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे घरभाडे भत्त्यात वाढ करणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यासह ते ‘१०-२०-३०’ ही करिअर प्रोग्रेशन योजना लागू करण्याची आणि वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















