शाळा बंदचा कुठलाही निर्णय नाही !
6940 Schools will Close Down- Just a Rumor
Due to Corona Financial crises state government is closing the schools with low attendance. This news is published in news papers. But it is found that this is just a Rumor. No Such a Action is taken by Educational Department.
कोरोनाच्या काळात नकारात्मक बातम्यांची संख्या कमी नाही. त्यात अफवांचे पीकही उठते. एक आवई अशीच उठली आहे की राज्य सरकारने चार हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे… हे ऐकून खुद्द शालेय शिक्षणमंत्रीही थक्क झाल्या आहेत. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी या अफवेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्री असताना ग्रामीण भागातील कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता नवे सरकार सत्तेत आहे, कोरोनाच्या काळात कोणत्याही शैक्षणिक घडामोडी होत नाहीत, अशा काळात पुन्हा शाळा बंद करण्याची बातमी माध्यमे आणि समाज माध्यमात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निदर्शनास या अफवेची बाब आणून दिली असता त्याही थक्क झाल्या. त्या म्हणाल्या, “लॉकडाऊन सुरू आहे, केवळ परीक्षांची चर्चा सुरू होती. या काळात शाळा बंद करण्याबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. त्यामुळे निर्णय होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. अशा बातम्या कशा दिल्या गेल्या याची चौकशी केली जाईल. मात्र सध्यातरी शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही.”
शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप आणि माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ही बातमी म्हणजे अफवा असल्याचे म्हटले आहे. शिक्षण संचालनालय आणि मंत्रालय स्तरावरही शाळा बंद बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्र्यांनी देखील याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत, तरीही शाळा बंद केल्याच्या बातम्या कशा काय दिल्या जातात? अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती समजून घेतली जात नाही, एखादी निराधार बातमीवरून अनेक लोक पत्रव्यवहार सुरू करतात. अशा बातम्यांमध्ये सरकारी दुजोरा असल्याशिवाय विश्वास ठेऊ नये, असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले.
खालील बातमी वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती, परंतु खुद्द शिक्षण मंत्रांनी हि बातमी खारीज केली आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाले कि हि अफवा होतील.