अकोला जिल्ह्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये तब्बल १,२३८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, २,००० पेक्षा अधिक रोजगार संधींचे दार उघडले गेले आहे. ९५ उद्योग-व्यवसायांशी झालेले हे करार जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

सध्या अकोला जिल्ह्याचा जीडीपी सुमारे ३६,००० कोटी रुपये असून, तो २०२८ पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टासाठी रेल्वे, वैद्यकीय सुविधा, विमानतळ विस्तार आणि एमआयडीसी क्षेत्र विस्तारासारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
उद्योगांना चालना देणारे निर्णय: राज्य शासनाच्या ‘सातकलमी कार्यक्रमा’नुसार गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘Ease of Living’, जलद परवानगी प्रक्रिया आणि ‘मैत्री 2’ एकल खिडकी प्रणालीद्वारे सुलभ सेवा दिल्या जात आहेत. उद्योजकांना अडथळे आल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचेही आवाहन करण्यात आले.
विशेष गुंतवणूक प्रकल्प:
- रिलायन्स सीएनजी प्रकल्पातून एकट्या १२० कोटींची गुंतवणूक
- जिल्हा उद्योग केंद्र व अकोला औद्योगिक संघटना यांच्या पुढाकारातून परिषद यशस्वी
जिल्ह्यातील विकासाला चालना देणारी ही परिषद स्थानिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एक व्यासपीठ देत असून, जिल्ह्याला एक औद्योगिक हब म्हणून उभारण्याच्या दिशेने ही सुरुवात ठरत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















