JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सरकारी नोकरीसाठी २ मुलांची अट संपली! पण सरकारचा नवा नियम जाहीर- 2 Children Conditions for sarkari naukri

2 Children Conditions for sarkari naukri – आता दोनपेक्षा जास्त मुले असलेले उमेदवारही मध्य प्रदेशात सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. तिसऱ्या अपत्यामुळे सुरू असलेल्या विभागीय चौकशा संपुष्टात येणार असून, अंतिम कारवाई झालेल्यांना मात्र दिलासा मिळणार नाही. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दोन मुलांच्या मर्यादेचा नियम रद्द करण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकारने घेतला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आता मध्य प्रदेशमध्ये दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारे नागरिकही सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. पण या शिथिलतेसोबत सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक अट लागू केली आहे. त्याचे पालन करणे प्रत्येक उमेदवारासाठी बंधनकारक असणार आहे.

2 Children Conditions for sarkari naukri
सरकारी नोकऱ्यांमध्ये मागील २५ वर्षांपासून लागू असलेला २ अपत्यांचा निर्बंध मोहन यादव सरकारने रद्द केला आहे. मंदसौर येथील गांधी सागरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. सामान्य प्रशासन विभागाच्या नागरी सेवा नियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या निर्णयानंतर तिसरे अपत्य झाल्यामुळे कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले जाणार नाही. तसेच तीन मुले असलेल्या उमेदवारांना नवीन भरतीसाठी अपात्र ठरवले जाणार नाही. यामुळे केवळ शालेय शिक्षण विभागातील ३०,००० हून अधिक शिक्षकांना थेट दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.हा निर्णय लागू होताच तिसरे अपत्य झाल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांविरुद्ध सध्या सुरू असलेली शिस्तभंगाची कारवाई किंवा विभागीय चौकशी तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणली जाईल. या नियमाअंतर्गत विविध विभागांमध्ये ८ ते १० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. बहुतांश तक्रारी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागांशी संबंधित आहेत. एकट्या वैद्यकीय शिक्षण विभागातील १२ तक्रारी निर्णयाच्या प्रतीक्षेत सामान्य प्रशासन विभागाकडे पोहोचल्या होत्या.

दोनपेक्षा जास्त मुले असल्यामुळे अपात्र ठरवल्या जाणाऱ्या उमेदवारांना शासकीय भरतीमध्ये सामील होणे सोपे होणार आहे. यापुढे फक्त मुलांच्या संख्येच्या आधारावर उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांमधून वगळले जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा जास्त मुले आहेत, ते विभागीय नियुक्ती आणि पदोन्नतीशी संबंधित पात्रतेसाठी या कारणास्तव अपात्र ठरणार नाहीत. पण यासाठी सुधारित नियमांनी याची पुष्टी करणे आवश्यक आहे. दोनपेक्षा जास्त मुले असणे हे गैरवर्तन मानणारी तरतूद काढून टाकली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याचा धोका नाहीसा झाला. मध्य प्रदेश सरकारने हा नियम शिथिल करताना एक महत्त्वाची अटही घातली आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच कारवाई होऊन अंतिम आदेश पारित झाले आहेत किंवा ज्यांना २००१ सालानंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे, त्यांची प्रकरणं पुन्हा उघडली जाणार नाहीत. पण तिसरं अपत्य असल्याच्या कारणावरून ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सध्या शिस्तभंगाची कारवाई किंवा विभागीय चौकशी सुरू आहे, ती आता संपुष्टात आणली जाईल.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड