11 वी प्रवेशाच्या 1 लाख 71 हजार 676 जागा रिक्त

11th Admission 2021

11th Admission 2021

11th Admission 2021 : Despite five rounds of the 11th Central Evidence Process in the state, it has been revealed that 1 lakh 71 thousand 676 seats are vacant. It has the highest number of vacancies in Mumbai. For the students who have not taken admission till now, first come first served rounds are being conducted between 25th and 30th October. All the students who have passed 10th in this round, ATKT concession students will be able to participate.

राज्यात अकरावीच्या केंद्रीय पुरावे प्रक्रियेच्या पाच फेऱ्या होऊनही 1 लाख 71 हजार 676 जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात मुमबीत सर्वाधिक जागा रिक्त आहेत. आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान शेवटची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबविण्यात येत आहेत. या फेरीत दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.

11th Admission 2021


Maharashtra Fyjc Admission 2021

11th Admission 2021:  The FCFS admission round of the Eleventh Central Online Admission Process is currently underway. The school education department has given relief to the students who have not got admission yet. FCFS admission round has been extended till October 21. Further details are as follows:-

अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. FCFS प्रवेश फेरीला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोणताही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये शिक्षण विभागातर्फे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला २१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच शिक्षण विभागांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.

11th Admission 2021

मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगपालिका विभागांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर ही या प्रवेश फेरीची शेवटची तारीख होती. पण शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या FCFS प्रवेश फेरीला ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Some students want to cancel their admission while some students have not yet filled the online form. In the meantime, the students have been instructed not to be deprived of admission due to some holidays. As per this instruction, students will be able to apply online under FCFS admission round till 12 noon on October 21. Also, after the allotment, admission will be confirmed till 6 pm on the same day.


FYJC Admission 2021

11th Admission 2021 : Admission will now be by priority round after the special round in the eleventh admission process. The registration process will be done in stages according to the percentage obtained by the students in the tenth. Further details are as follows:-

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीनंतर आता प्राधान्य फेरीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत. यात विद्यार्थ्यांना दहावीत मिळालेल्या टक्क्यांनुसार टप्प्याटप्याने नोंदणी प्रक्रिया होणार आहे. यासाठीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले असून पहिली फेरी आज, मंगळवारपासून सुरू होणार आहे. प्राधान्य फेरीमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगर क्षेत्रांतील ज्युनिअर कॉलेजांतील प्रवेश ऑनलाइन नोंदणीने केले जाणार आहेत.

ज्या कॉलेजांमध्ये रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करून हे प्रवेश घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ९० टक्यांवरील विद्यार्थ्यांना २८ व २९ सप्टेंबरला नोंदणी करता येणार आहे. सकाळी १०पासून सायंकाळी ६ या वेळेत नोंदणी करून संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. यानंतर ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरला ८० टक्क्यांवरील, २ ते ४ ऑक्टोबर ७० टक्क्यांवरील, ५ ते ६ ऑक्टोबर ६० टक्क्यांवरील, ७ ते ९ ऑक्टोबर ५० टक्क्यांवरील, १० ते १२ ऑक्टोबर ३५ टक्क्यांवरील आणि शेवटची फेरी एटीकेटी आदी विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांची माहिती शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

राज्यभरातील रिक्त जागा

 • अमरावती ७,०३३
 • मुंबई १,३६,०३९
 • नागपूर २९,९४१
 • नाशिक ८,८३५
 • पुणे ५२,२८७
 • एकूण २,३४,१३५

FYJC Admission Vacancy

11th Admission 2021 : Despite the announcement of 100 percent results of Class X this year and after four admission rounds, more than two lakh seats of Class XI remain vacant in the state. Students who have not yet been admitted will now be admitted on a first-come, first-served basis. Further details are as follows:-

यंदा दहावीचा शंभर टक्के निकाल जाहीर होऊनही आणि चार प्रवेश फेऱ्यांनंतर राज्यात अकरावीच्या दोन लाखांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता रिक्त जागांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

11th Admission 2021


FYJC Admission 2021

11th Admission 2021 : The first special merit list of the eleventh admission has been announced. A total of 76 thousand 203 students submitted applications for 1 lakh 45 thousand 473 seats. Branch wise total number of student applications and college allotment figures have been released.

अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १ लाख ४५ हजार ४७३ जागांवर एकूण ७६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. शाखानिहाय एकूण विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या आणि कॉलेज अलॉटमेंट झालेली आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १ लाख ४५ हजार ४७३ जागांवर एकूण ७६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. यातील ६४ हजार ८६६ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले.


Maharashtra FYJC Admission 2021

11th Admission 2021 : For the eleventh online admission, a special round for the eleventh admission will be held from today, September 17. There are still 11 lakh vacancies and students can apply online from today. Further details are as follows:-

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी आज, १७ सप्टेंबरपासून अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी होणार आहे. अद्याप अकरावीच्या लाखो जागा रिक्त असून विद्यार्थी आजपासून ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची मुदत २० सप्टेंबरपर्यंत असून या दरम्यान बायफोकल शाखेसाठीही यात अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित होऊनही ज्यांनी प्रवेश नाकारले आणि ज्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्याना या विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात अद्याप अकरावीच्या लाखो जागा रिक्त असून विद्यार्थी आजपासून ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले आहे हे २२ सप्टेंबरला समजणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये कॉलेज वाटपाविषयी कळविले जाईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत असून प्रवेशानंतर रिक्त जागांचा तपशीलही २५ सप्टेंबरला रात्री उशिरा वेबसाइटवर जाहीर केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.


FYJC Third Merit List 

11th Admission 2021 : The third merit list of the 11th online admission (FYJC Admission 2021) will be announced today, Monday 13th September at 10 am in Mumbai, Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur Municipal Corporation areas. In addition, a third quality list of in-house, management quota, and minority quota admissions will also be announced. 

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबधित कॉलेजात जाऊन प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात आज, सोमवारी १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची (FYJC Admission 2021) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यासोबतच इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा, आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाचीही तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.


Maharashtra FYJC Admission 2021

11th Admission 2021 : According to the first list of the eleventh online, one day extension has been given for confirmation of admission. Students will be able to get admission as per the first list till 6 pm on 31st August 2021. Further details are given below.

अकरावी ऑनलाइनच्या पहिल्या यादीनुसार प्रवेश निश्चितीसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या यादीनुसारचे प्रवेश घेता येतील. ज्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रवर्गानुसार प्रवेश अलॉट झाले असतील त्यांच्यासाठी शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार, शिक्षण संचालकांनी काही सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे –

 • – ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळालेला आहे, त्यांना जात प्रवर्गाबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करायची आवश्यकता नाही.
 • – ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे, त्यांनी त्या प्रस्तावाची पोच आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास असे विद्यार्थी त्या प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र असतील.
 • – ज्या विद्यार्थ्यांकडे स्वत:चे जात प्रमाणपत्र तसेच प्रस्तावाची पोच दोन्ही नाहीत, त्यांनी प्रवेशासाठी वडिलांचे जात प्रमाणपत्र आणि हमीपत्र सादर केल्यास असे विद्यार्थी त्या प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र असतील.
 • – हमीपत्र दिलेल्या तसेच प्रस्तावाची पोच दिलेल्या विद्यार्थ्यांना ३० दिवसात स्वत:चे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील, अन्यथा अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील.
 • – VJ/NT, OBC, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासोबत उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (NCL)सादर करणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हमीपत्र घेऊन ३० दिवसांची मुदत देण्याबाबत पूर्वी संकेतस्थळावर दिलेल्या सूचना कायम राहतील.

FYJC Online Merit List

11th Admission 2021 : The first quality list of eleven online admissions has been released. Students can find out which college was allotted to them from the Eleventh Admissions website. Further details are as follows:-

अकरावी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांच्या संकेतस्थळावरून त्यांना कोणते कॉलेज अलॉट झाले त्याची माहिती मिळवता येईल. शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

How to Download Merit List 

 • – सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.
 • – आपला आयडी पासवर्ड देऊन लॉग इन करा.
 • – लॉग इन केल्यावर स्क्रीनवर तुमचे डिटेल्स येतील.
 • – डॅश बोर्डवर ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ पर्यायावर क्लिक करा.
 • – कॉलेज अलॉट झालं असेल तर त्याचं नाव येथे दिसेल.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ – mumbai.11thadmission.org.in


FYJC Admission 2021

11th Admission 2021 : Minister for School Education Varsha Gaikwad has given important information regarding the cut off for first year admission in junior colleges. The first list of 11th entrants will be announced on August 27. At this time, he released the statistics of the eleventh registration and application acceptance by the department. Further details are as follows:-

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी कट ऑफ संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. अकरावी प्रवेशाची पहिली यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. यावेळी त्यांनी विभागवार अकरावी नोंदणीची आणि अर्ज स्वीकारल्याची आकडेवारी जाहीर केली. FYJC गुणवत्ता यादी या फेरीत जाहीर केली जाईल तसेच नवीन अर्ज स्वीकारले जातील. सोबतच पुढे आणखी तीन फेऱ्या देखील होणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटनुसार, ‘प्रवेश फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी २७ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. यानंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल. ही फेरी MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील महामंडळाच्या भागातील अकरावी प्रवेशासाठी आहे. MMR हे मुंबई महानगर क्षेत्र आहे.’

In another tweet, the Education Minister said, “The status of registration and eligible applications for the first general round of centralized online admission in FYJC 2021-22 for MMR and other areas is as follows: In Amravati, the total number of registrations was 10,673, out of which 8,158 applications were accepted. The total number of registrations in Mumbai is 2 lakh 37 thousand 952 out of which 2 lakh 2 thousand 58 applications were accepted. 

A total of 27 thousand 239 registrations were registered in Nagpur division out of which 19 thousand 256 applications were accepted. The total number of registrations in Nashik division was 22 thousand 211 out of which 16 thousand 753 applications were accepted and in Pune a total of 77 thousand 276 applications were filed out of which 59 thousand 886 applications were accepted. 


11th Admission 2021 Provisional Merit List

11th Admission 2021 : A provisional merit list for the 11th admission in Pune and Pimpri-Chinchwad area has been announced. Objections or corrections to this list can be lodged till 5 pm on 24th August and the final merit list will be announced on 25th August.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीवर आक्षेप अथवा दुरुस्ती 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदवता येणार असून, 25 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.


Maharashtra FYJC Admission Schedule

11th Admission 2021 : The state government on Thursday announced its decision to cancel the CET for the eleventh admission. After that, the registration for the eleventh admission has started on the same day. Accordingly, the students have to fill the application form online from 14th to 22nd August, after which they have to apply.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शुक्रवार १४ ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात होत आहे. २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. https://11thadmission.org.in/ लिंकवर नोंदणी होणार. अर्जातील भाग एक १४ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून, त्यानंतर अर्ज करायचा आहे, अशी माहिती माध्यमिक विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

त्यानंतर विद्यार्थ्यांना १७ ते २२ ऑगस्ट य़ा कालावधीत अर्जाचा भाग दोन म्हणजे कॉलेजांचे पर्याय भरायचे आहेत. प्राथमिक गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप आणि तक्रारी असल्यास २३ आणि २४ ऑगस्ट रोजी करता येईल. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रवेशाची गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार असून, त्यानुसार विद्यार्थांना कागदपत्रे आणि शुल्क जमा करून २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या यादीसाठी कॉलेजांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांची माहिती ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती जगताप यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

11th Admission Timetable

 • भाग एक भरणे : १४ ते २२ ऑगस्ट
 • भाग एक व दोन भरणे : १७ ते २२ ऑगस्ट
 • प्रवेशाची गुणवत्ता यादी : २७ ऑगस्ट
 • प्रवेश घेणे : २७ ते ३० ऑगस्ट
 • प्रवेशाची दुसरी फेरी : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
 • प्रवेशाची तिसरी फेरी : ५ ते ११ सप्टेंबर
 • प्रवेशाची चौथी फेरी : १२ ते १७ सप्टेंबर

FYJC CET Exam Cancelled

राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली. अकरावी सीईटी न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मिळाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती.

सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही. त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.


11th Admission 2021 :शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 9 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तर, दुसरा भाग भरण्यासाठीचे वेळापत्रक यथावकाश जाहीर होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर 1 ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपासून महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून भरलेली माहिती प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे.अकरावी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांच्या संकेतस्थळावरून त्यांना कोणते कॉलेज अलॉट झाले त्याची माहिती मिळवता येईल.

कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. 9 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी लिंक खुली केली जाणार आहे. विद्यार्थी स्वत: अथवा पालकांच्या मदतीने किंवा शाळा आणि मार्गदर्शन केंद्राची मदत घेऊन अर्ज करू शकतील. प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रथम ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर लॉगीन आयडी मिळवणे व पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मिळालेल्या लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरावा. शुल्क भरून अर्ज लॉक करणे आवश्‍यक आहे.


11th Admission 2021 : After the cancellation of the 10th examination, there were question marks regarding the internal assessment of the students and the 11th admission. The state education department had decided to conduct an online survey through SCERT to find an alternative. Now the deadline for this survey has been extended till tomorrow (Tuesday, May 11).

11th Admission : सीईटी सर्वेक्षणाला मुदतवाढ. दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि अकरावी प्रवेश या संदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यावर पर्याय शोधून काढण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने ‘एससीईआरटी’च्या माध्यमातून ऑनलाइन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आता या सर्वेक्षणाची मुदत उद्या (मंग‌‌ळवार, ११ मे) पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

‘सीईटी’प्रमाणेच दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भातही शाळांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत असून, शाळांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य आहे की नाही, याबाबत राज्यातील १४ हजार ३७९ शाळांनी आपले अभिप्राय नोंदवले आहेत. आणखी काही शाळांचे अभिप्राय येणे अपेक्षित असून, त्यानंतरच अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य आहे, का याबाबत स्पष्टता येणार आहे. या दोन्ही सर्वेक्षणांमध्ये उद्या, मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थी व शाळांना त्यामध्ये सहभागी होता येणार आहे.


अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – त्वरा करा

11th Admission 2021 : अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – त्वरा करा. अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2020-2021 मध्ये एफसीएफएस नवीन प्रवेश फेरी 19 मार्चपासून सुरू होत आहे. याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा 19 ते 26 मार्च दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. यानंतर अकरावी प्रवेशासाठी संधी मिळणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केेले आहे. इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण 4,407 जागा रिक्त आहेत.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…..


राज्यात अकरावीच्या 1 लाख 81 हजार जागा रिक्त

11th Admission 2021 : राज्यातील सहा महापालिका क्षेत्रांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ८१ हजार ६३७ जागा रिक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिक्त जागा साडेबारा हजारांनी घटल्याचे दिसून येत आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिकांच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव आणि सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील निर्णयास झालेला विलंब या कारणांमुळे यंदा प्रवेश प्रक्रिया बराच काळ रखडली. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेऱ्या घेण्यात आल्या. ही प्रवेशप्रक्रिया मंगळवारी संपली. त्यानंतर राज्यातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी समोर आली आहे. गेल्यावर्षी राज्यात १ लाख ९४ हजार ३५७ जागा रिक्त राहिल्या होत्या.

यंदा या प्रवेश प्रक्रियेत ५ लाख ५९ हजार २१३ जागा उपलब्ध झाल्या. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ५७६ जागांवर प्रवेश झाले, तर १ लाख ८१ हजार ६३७ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या सहा विभागांपैकी सर्वाधिक रिक्त जागा मुंबईमध्ये आहेत. मुंबईतील ९७ हजार ९९ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या खालोखाल, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या विभागांचा क्रमांक लागतो.

विभाग प्रवेश क्षमता झालेले प्रवेश रिक्त जागा

 • अमरावती १५,३६० १०,९३९ ४,४२१
 • औरंगाबाद ३१,४७० १६,९३३ १४,५३७
 • मुंबई ३,२०,७५० २,२३,६५१ ९७,९९
 • नागपूर ५९,२५० ३४, ७९९ २४,४५१
 • नाशिक २५,२७० १९,७०० ५,५७०
 • पुण १,७,११३ ७१,५५४ ३५,५५९
 • एकूण ५,५९,२१३ ३,७७,५७६ १, ८१,६३७

सोर्स : लोकसत्ता


अकरावीच्या 24 हजारांहून अधिक जागा रिक्त

11th Admission 2021 : अकरावीत प्रवेशाची अखेरची मुदत मंगळवारी संपल्यानंतर रिक्त जागांची आकडेवारी समोर आली आहे. शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील २४ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. विज्ञान शाखेतील रिक्त जागांची संख्या साडेआठ हजारांहून अधिक आहे.

१२ आॅगस्ट रोजी अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती. शून्य फेरी, तीन मुख्य, दोन विशेष आणि दोन प्रथम प्राधान्य फेऱ्यांनंतर ३४ हजार ७९९ जागांवरच प्रवेश झाले. २४ हजार ४५१ जागा रिक्त राहिल्या आहेत. पाडण्यात आल्या. विज्ञान शाखेच्या सर्वाधिक ८ हजार ७३१ जागा रिक्त राहिल्या आहेत. वाणिज्य व कला शाखेतील रिक्त जागांची संख्या अनुक्रमे ७ हजार ९६३ व ५ हजार ६४५ इतकी आहे.

महाविद्यालयांसमोर अडचण

अगोदरच ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यातच आता रिक्त जागांचा आकडा मोठा असल्याने चिंता आणखी वाढीस लागली आहे.

शाखानिहाय प्रवेश व रिक्त जागा

शाखा-प्रवेश-रिक्त जागा

 • कला-४,०१४- ५,६४५
 • वाणिज्य-१०,०३७-७,९६३
 • विज्ञान-१८,७२९-८,७३१
 • एमसीव्हीसी-२,०१८-२,११२

सोर्स : लोकमत


FYJC Online: प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम फेरी

11th Admission 2021 : fyjc online admission 2021 one final round for those students who still not get admission – अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेशासाठी विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र तरीही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी एक अंतिम फेरी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांनी १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहे.

अंतिम फेरीचे वेळापत्रक आणि नियोजन पुढीलप्रमाणे असेल –

१) या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल आणि १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.

२) ही प्रवेशांचि अंतिम फेरी असणार आहे. २०२०-२१ च्या प्रवेशांसाठी १३ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक आहे. यानंतर अकरावीचे प्रवेश बंद होतील.

३) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर हे प्रवेश होणार आहेत.

प्रवेशांचे वेळापत्रक –

 • ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ – ऑनलाइन अर्ज भरणे, प्रव%0श रद्द करणे (आवश्यकता असल्यास), मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज पडताळणी करणे
 • ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ – प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर प्रवेशांची फेरी सुरू. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार
 • ८ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२१ – अलॉटमेंट मिळाल्यावर प्रोसिड फॉर अॅडमिशन हा पर्याय क्लिक करणे. दिलेल्या कॉलेजमधील प्रवेश निश्चित करणे.
 • १३ फेब्रुवारी २०२१ (सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) – कॉलेजांनी झालेल्या प्रवेशांची स्थिती दर्शवणे
 • १४ फेब्रुवारी २०२१ – रिक्त जागा आणि अंतिम प्रवेश स्थिती जाहीर करणे.

 

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Vishalraj says

  Form barnar ahe link patva sir

 2. Aniket sutar says

  Medical department

 3. Prashant devakar says

  रजिस्ट्रेशन केलं नंतर कॉलेज ला अर्ज कसा करावा (११ वि )

 4. Rohit Khobragade says

  12th pass pan beroj gar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड