१२ डिसेंबर दिनविशेष
चालू घडामोडी १२ डिसेंबर २०१९ (Chalu Ghadamodi 2019)
- फिनलंडच्या पंतप्रधानपदी ३४ वर्षीय सना मरीन यांची निवड झाली असून, जगातील सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रप्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
- रिझर्व्ह बँक, मुडीज,’आयएमएफ’ पाठोपाठ आता आशियाई विकास बँकेने(ADB)भारताचा चालू वर्षाचा विकासदराचा (GDP) अंदाज ५.१ टक्क्यापर्यंत घटवला आहे.
- पुढील आठवड्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले जाण्याची दाट शक्यता आहे.
- एटीएम फ्रॉड, नेट बँकिंग आणि डेबिट कार्डसारख्या फसवणुकीच्या घटनांमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८-१९ या वर्षात फ्रॉडमधून ग्राहकांची तब्बल १४९ कोटींची फसवणूक झाली आहे. दिल्लीत सर्वाधिक फ्रॉड झाल्याचे दिसून आले आहे.
- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.
- रोहित शर्मा ४०० षटकार लगावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू, टीम इंडियाचा उपकर्णधार आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने बुधवारी आपल्या नावावर षटकारांचा विक्रम केला.
- भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेअंतर्गत १० हजार अमेरिकन ‘सिग सउर अॅसॉल्ट रायफल्स ‘ (American SiG Sauer assault) ची पहिली खेप भारताला मिळाली आहे.
- भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतची हाराकिरी सुरुच आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली.
- द्विशतकी खेळीत पृथ्वी शॉचा विक्रम सचिन रोहित शर्माला टाकलं मागे, उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉने धडाकेबाज खेळी केली आहे.
- गोलंदाज फलंदाज नव्हे तर अंपायर करणार विक्रम, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी पर्थमध्ये सुरू होणार आहे. कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने हा सामना दोनही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
- भारतालाही डोपिंगचा फटका दोन खेळाडूंचे निलंबन
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही महिने उरले असताना भारतालाही डोपिंगचा फटका बसला आहे.
भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले आहेत.
१२ डिसेंबर – महत्वाच्या घटना
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन.१८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.१९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.१९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
१९६३ – केन्याला (राष्ट्रध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
२००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
२०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
१२ डिसेंबर – जन्म
- १८७२: राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९४८)१८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८)१८९२: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९६५)१९०५: लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)
१९०७: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)
१९१५: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९९८)
१९२५: भारतीय क्रिकेटर दत्ता फडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९८५)
१९२७: इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९०)
१९४०: राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म.
१९५०: प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म.
१९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.
१९८१: भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग यांचा जन्म.
१२ डिसेंबर – मृत्यू
- १९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन.१९६४: हिन्दी राष्ट्रकवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)१९९१: शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन.१९९२: साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)
२०००: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)
२००५: हिंदी चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९१७)
२००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)
२०१२: सतार वादक, भारतरत्न पण्डित रवी शंकर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२०)
२०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)
२०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)