जिल्हा परिषद भरती अंतर्गत नवीन 386 शिक्षकांची नियुक्ती, महत्वाचा अपडेट!! | ZP Ratnagiri Bharti 2025

ZP Ratnagiri Offline Application 2025

Zilla Parishad Ratnagiri Bharti 2025

 

जिल्हा परिषदेला 386 नवे कंत्राटी शिक्षक मिळाले आहेत. मंगळवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यामुळे सध्यातरी ग्रामीण भागातील शाळांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यातील दोन जिल्हा परिषदांनी कंत्राटी शिक्षक भरती थांबवल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतीवर स्थगितीची टांगती तलवार होती; मात्र शासनाकडून प्रक्रिया स्थगितीचे कोणतेही आदेश न आल्यामुळे मंगळवारी 386 शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यापूर्वी 105 जणांना नियुक्ती दिली गेली होती. 1 ते 10 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत. त्यामुळे 1100 पैकी 40 टक्के पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागामधून तक्रारीचे सूर उमटत होते. राजकीय पक्षांनीही आंदोलनाचा इशारा देत सत्ताधार्‍यांची अडचण केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये सुरू झाली. काही कालावधीतच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पुन्हा कंत्राटी शिक्षक भरती थांबली. या गोंधळात नवीन शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, असे चित्र पाहायला मिळत होते. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने काही शाळांवर कामगिरीने शिक्षक नियुक्त केले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागला. याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने रखडलेली कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरवात केली. ZP Ratnagiri Bharti 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या नियुक्तीला राज्यभरातून विरोध होत असल्यामुळे पुन्हा त्यात अडथळा निर्माण झाला होता; मात्र शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन जि. प. प्रशासनाने तातडीने थांबलेली प्रक्रिया वेगाने सुरू केली. पहिल्या टप्प्यात 105 जणांना नियुक्ती दिली असून, दुसर्‍या टप्प्यात 386 जणांना पत्र दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कायम रिक्त पदे असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरले गेलेले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

 


ZP Ratnagiri Bharti 2024: Zilla Parishad Ratnagiri is going to conduct new recruitment for the posts of “Advocate”. There are total of 31 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Ratnagiri. Interested and eligible candidate can send their application form to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 11th of September 2024. For more details about ZP Ratnagiri Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत “वकील” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.

 

  • पदाचे नाववकील
  • पदसंख्या31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणरत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, रत्नागिरी ४१५६१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख11 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zpratnagiri.org/

How To Apply For ZP Ratnagiri Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह  zpratnagiri.org वर उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpratnagiri.org Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/jmPH5
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.zpratnagiri.org/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    ZP Ratnagiri Bharti 2025 Latest Update

  2. MahaBharti says

    new ZP Vacancy

  3. MahaBharti says

    New ZP Update

  4. Abdul samad patel says

    Muzhe kaam chahiye please 47 age hay meri koi bhi job please

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड