ZP Pune Recruitment 2023 – सावधान, जिल्हा परिषद बोगस कर्मचारी भरती! – ZP Pune Bharti 2023
ZP Pune Recruitment 2023
ZP Pune Bharti 2023
ZP Pune Recruitment 2023 – Divisional Commissioner Saurabh Rao set up a three-member inquiry committee to hear again the grievances of gram panchayat employees who were disqualified and dismissed from service by the BMC in the controversial recruitment case of gram panchayats included in the civic body under ZP Pune Bharti 2023. He ordered the committee to hold a hearing again. As many as 21 gram panchayats under zilla parishad jurisdiction have been included in the municipal area. Some of the employees recruited by these gram panchayats have been disqualified by the civic administration.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमधील वादग्रस्त भरती प्रकरणात अपात्र ठरलेल्या आणि महापालिकेने सेवेतून कमी केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बाजू पुन्हा ऐकून घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीने पुन्हा सुनावणी घ्यावी, असा आदेश त्यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील २१ ग्रामपंचायती महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी भरती केलेले काही कर्मचारी महापालिका प्रशासनाने अपात्र ठरविले आहेत. त्यांना संधी देण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राव यांनी फेरविचार समितीची बैठक घेतली आणि कार्यकक्षा निश्चित करून दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे समितीचे अध्यक्ष असून विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त अजय जोशी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे हे सदस्य आहेत.
हवेली आणि मुळशी या तालुक्यांतील २३ महसुली गावांतील २१ ग्रामपंचायती गतवर्षी महापालिकेत समाविष्ट झाल्या. ही प्रक्रिया पार पाडताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत वर्ग करण्यात आले. मात्र गावे समावेशाची घोषणा झाल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारी भरती झाली. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या चर्चेनंतर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद चौकशी समिती नेमली होती. त्यात दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार समिती नेमण्यात आली. आधीचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे आहे, मात्र अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बाजू मांडायची असेल तर या समितीपुढे ते येऊ शकतात.
ZP Pune Bharti 2023: As many as 74,507 candidates have applied for 1,000 posts in zilla parishad jobs. Pune Zilla Parishad is conducting the process of direct service recruitment for 21 posts of Group C cadre. Online applications were invited to ZP Pune Recruitment 2023 . Rahul Gawade, deputy chief executive officer of the general administration department of the zilla parishad, said that the zilla parishad has received Rs 6.66 crore from this through the application process. All this is being done through a private agency, IBPS. The deadline to apply was Aug. 5-25.
जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी एक हजार पदांसाठी 74 हजार 507 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुणे जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील 21 पदांच्या सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला यातून 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली. आयबीपीएस या खासगी यंत्रणेद्वारे ही सर्व प्रक्रिया होत आहे. अर्ज करण्यासाठी 5 ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली होती. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक (पुरुष) पदासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. या पदासाठी 124 जागा असून, त्यासाठी 28 हजार 209 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्यसेवक महिला) पदासाठी 436 जागा असून, त्यासाठी 3 हजार 930 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 37 जागांसाठी 4 हजार 575 उमेदवारांनी, आरोग्यसेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या 128 जागांसाठी 2 हजार 898 अर्ज आले आहेत. औषध निर्माण अधिकारी पदासाठी 25 जागांसाठी 5 हजार 573, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी 1 हजार 405 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या या विविध पदांसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेला अर्ज प्रक्रियेतून प्राप्त झालेले पैसे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कंपनीला देण्यात येणार आहेत. दरम्यान, विस्तार अधिकारी (पंचायत) 3 जागांसाठी 1 हजार 784, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2 जागासाठी 819, विस्तार अधिकारी (कृषी) 2 जागांसाठी 193, विस्तार अधिकारी (शिक्षण) 2 जागांसाठी 144, वरिष्ठ सहायकाच्या 8 जागांसाठी 5 हजार 31, पशुधन पर्यवेक्षकच्या 30 जागांसाठी 463, कनिष्ठ आरेखकच्या 2 जागांसाठी 68, कनिष्ठ लेखा अधिकारी 3 जागांसाठी 213 अर्ज आले आहेत.
An advertisement for the ZP Pune Recruitment to fill 1000 posts is published by Pune Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the 1000 Vacancies. Its really a Good news for ZP job seekers. As per the latest update for Zilla Parishad Pune Recruitment 2023 this bharti process will be conducted by IBPS. Zilla Parishad Pune is going to start the latest recruitment process for the Various posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts. Large number of 1000 vacancies are going to be filled in this recruitment. Application forms will begin from 5th August 2023, while last date to apply is 25th August 2023. Further details are as follows:-
चार वर्षांपासून रखडलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत ‘क’ गटातील २१ पदांच्या सुमारे एक हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये एकाच वेळी मेगाभरती करण्यात येणार असल्याने तरुणांना रोजगाराची संधी खुली झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक, जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
ZP Pune Recruitment 2023
जिल्हा परिषद पुणे च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध १,००० रिक्त पदे जिल्हा परिषद पुणे च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण १,००० रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Zilla Parishad Pune Bharti 2023
- पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
- पद संख्या – 1000 Posts
- शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
- अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
- वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
- अधिकृत वेबसाईट-https://www.zppune.org/
Vacancy Details ZP Pune Bharti 2023
Zilla Parishad Pune Recruitment 2023 Details
Organization Name | Zilla Parishad Pune [ZP Pune ] |
Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
Total posts | 1000 Vacancies |
Job location | Pune District |
Application started on | 5th August 2023 |
Last date to apply | 25th August 2023 |
Category | Online ZP Recruitment 2023 |
Website | https://www.zppune.org/ |
How To Register For Zilla Parishad Pune Group C Bharti 2023
अर्ज नोंदणी
१. उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर जावे.
२. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
३. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट” ” (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
४. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/ करणे शक्य होणार नाही.
५. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
६. “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील ” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
७. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
८. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
९. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
१०. “पेमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट ” (Submit) बटणावरक्लिक करावे.
Documents Required For ZP Satara Online Application
ZP Maharashtra Required Document List : आवश्यक कागदपत्रे यादी (mahabharti.in)
ZP Pune Recruitment Important Dates
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Pune Application Form
Important Links For zpPune.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://t.co/w35Mx2t7QX |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु! |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.zppune.org/ |
ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा | जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा |
जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या | जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? |
ZP Pune Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता
Post Name | Educational Qualification |
Pharmacist (औषध निर्माता) | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार |
Health workers (Male) (आरोग्य सेवक) | विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. |
Health workers (Female) (आरोग्य सेविका) | ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील |
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
Gram Sevak (ग्रामसेवक) | किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम |
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) | यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) | विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र |
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल. |
Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
Jodari (जोडारी) | जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील. |
Electrician (तारतंत्री) | महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार |
Supervisor (पर्यवेक्षिका) | ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. |
Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) | संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम |
Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) | ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
Rigman (रिगमन) | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. |
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | पदवीधर |
Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) | पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव |
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) | ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. |
Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) | जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य |
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, |
Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल |
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार |
Zilla Parishad Pune Required Age Limit – वयोमर्यादा
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२, दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाळी ४५ वर्षे) देण्यात आलेली आहे.
ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा
दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.
ZP Pune Age Limit 2023 |
|
सर्वसाधारण प्रवर्ग | 18 ते 40 वर्षे |
मागास प्रवर्ग | 18 ते 45 वर्षे |
मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत
ज्या उमेदवारांनी मार्च, २०१९ परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत २ वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून फक्त या परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. परंतू यासाठी उमेदवारांने नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
त्यानुसार सन २०२३ मध्ये घेणेत येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेकरीता ज्यांनी मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरलेले होते व त्यांचे वयाधिक्य झालेले आहे, अशा उमेदवारांना वयामध्ये सूट देणेत येऊन या परीक्षेकरीता पात्र समजणेत येईल.
सन २०२३ च्या जाहिरातीनुसार वयामध्ये सूट मिळविण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केला असलेबाबत अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
ZP Pune Online Application Fee – अर्ज शुल्क
Zilla Parishad Pune Arj Shulk |
|
सर्वसाधारण प्रवर्ग | रु. 1000 |
मागास प्रवर्ग | रु. 900 |
माजी सैनिक | अर्ज शुल्क नाही |
Other Essential Qualification For ZP Pune Online Application
वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामाईक अर्हता खालील प्रमाणे असेल.
सामाईक अर्हता | तपशिल |
संगणक अर्हता | कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस – २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद | केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक | आहे. परंतू इतर पदांसाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि. १९/०३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. |
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन | महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होतांना विवाहीत उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील. प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोन | पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या, अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल. या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटूंब याचा अर्थ, दोन अपत्ये यांसह पत्नी व पती असा आहे. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Pune Application Form
Important Links For Zilla Parishad Pune Application Form
|
|
???? PDF जाहिरात | https://t.co/w35Mx2t7QX |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु! |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.zppune.org/ |
ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा | जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा |
जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या | जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? |
Table of Contents
ZP PUNE castwise form bharleli pdf send kra na
अर्ज भरणेसाठी लिंक ओपन होत नाही