Zilla Parishad Dharashiv Result
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाचे अधिनस्त संवर्गापैकी कनिष्ठ सहाय्यक (लि.व.) या संवर्गासाठीचे सेवाप्रवेश नियम शासन राजपत्र असाधारण दि.07 मार्च, 2024नुसार सुधारीत झालेले असून त्याप्रमाणे पदोन्नतीने भरण्यासाठीची रिक्त पदे, वित्त विभागाचे अधिनस्तकनिष्ठ सहाय्यक (लेखा) संवर्गातील पदोन्नतीने भरण्यासाठीची रिक्त पदे तसेच आरोग्य विभागाकडीलआरोग्य सेवक (पु) या संवर्गासाठीचे सेवाप्रवेश नियम शासन राजपत्र असाधारण दि.17 डिसेंबर, 2025 नुसार सुधारीत झालेले असून त्याप्रमाणे पदोन्नतीने भरण्यासाठीची रिक्त पदे अशी विविध संवर्गातील पदोन्नतीने भरण्यासाठीच्या रिक्त पदे ही एस.एस.सी.उत्तीर्ण जिल्हा सेवा (वर्ग-4) परिचरसंवर्गातील कर्मचा-यांमधून भरण्यात येणार असल्याने त्याबाबत सेवाप्रवेश नियमातील शैक्षणिक व
इतर पात्रतेप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार पात्र कर्मचा-यांचे मुळ सेवापुस्तिका, मुळ शैक्षणिक व इतरकागदपत्राची मागणी करण्यात आलेली होती. वरीलप्रमाणे वर्ग-4 परिचर कर्मचा-यांच्या प्राप्त मुळ सेवापुस्तिका, मुळ शैक्षणिक व इतरकागदपत्रांचे तपासणीअंती जिल्हा सेवा वर्ग-4 परिचर संवर्गातील एस.एस.सी.किंवा तत्सम परीक्षाउतीर्ण व आरोग्य सेवक (पु) तसेच कनिष्ठ सहाय्यक (लिपीक लेखा) या पदासाठीच्या नियुक्तीबाबतपात्र, अपात्र असलेल्या कर्मचारी यांची विहित विवरणपत्रामधील माहिती यासोबत प्रसिध्द करण्यात येवून त्याबाबत दि.02.07.2026 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत आक्षेप हरकती मागविण्यात येत आहेत.
पात्र, अपात्र कर्मचारी यांची माहिती
Previous Updates
धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी स्वरूपात नियुक्ती देण्यासाठी एमबीबीएस/बीएएमएस पदवी / पदव्युत्तर अर्हताधारक उमेदवारांचे थेट अर्जाद्वारे समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याकरिता आदर्श आचारसंहिता संपुष्टात येण्याच्या अधीन राहून दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक वेळ 10:00 वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेले आहेत. गुणवत्तेनुसार अर्हताधारक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव येथे हजर रहावे.
Zilla Parishad Dharashiv Result
जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव कार्यालयासाठी “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” हे कंत्राटी पद निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यासाठी दिनांक 09/10/2025 रोजी सकाळी 11.00 वा. सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी याबाबत नोंद घेवून मुलाखीतस वेळेत उपस्थित राहवे.

Health Department, Zilla Parishad Dharashiv Result
कंत्राटी पदध्तीने भरावयाच्या वैद्यकिय अधिकारी पदासाठी मागविण्यात आलेल्या अर्जानुसार बीएएमएस अहर्ताधारक वैद्यकिय अधिकारी यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. या यादी मध्ये कांही अक्षेप नोंदवायचे असल्यास, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयास नोंदविण्यात यावेत, त्यानंतर आलेल्या आक्षेपांची विचार केला जाणार नाही.
यादीतील अनुक्रमांक १ ते १० यांनी दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी मुळ कागदपत्रासह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव येथे सकाळी ठिक १०.३० वाजता स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे.
मुलाखती करीता निवडलेल्या उमेदवारांची यादी
ZP Dharashiv Gram Sevak List
धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन २०२३ साठी जाहिरात क्र.१/२०२३ दिनांक ०५.०८.२०२३ चे अनुषंगाने विविध संवर्गातील ४५३ पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये आरोग्य सेवक पुरुष ५०% संवर्गातील ९७ पदे भरणेसाठी IBPS मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या Online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवून सदर उमेदवारांची मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली होती.
वर नमुद केल्याप्रमाणे आरोग्य सेवक पुरुष ५० टक्के संवंर्गातील हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी उमेदवारांचा तात्पुरती पात्र/अपात्र यादी व आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के या संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांसाठी IBPS कंपनीमार्फत दिनांक ११.०६.२०२४ रोजीच्या ऑनलाईन परिक्षेमध्ये निवडसुचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीअंती प्रवर्गनिहाय पात्र/अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. www.zposmanabad.gov.in व www.osmanabad.gov.in वर प्रसिध्द करण्यात येवुन सदर यादी तात्पुरती पात्र/अपात्र असून सदर यादीवरील आक्षेप किंवा कागदपत्राची पुर्तता दिनांक ०४.०४.२०२५ पर्यत कार्यलयीन वेळेत जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव यांच्या कार्यालयात सादर करावेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| Important Links For ZP Osmanabad Result 2025 | |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















