Zoom अनेकांना नोकऱ्या देणार
Zoom App Vacancies India
Zoom App Vacancies India – लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम भारतात पुढील पाच वर्षांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. पुढील पाच वर्षांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
झूमच्या उत्पादन व अभियांत्रिकीचे अध्यक्ष वेलचामी शंकरलिंगम यांनी एक ब्लॉग पोस्टमध्ये चीनशी संबंध नाकारण्याचा प्रयत्न करत “चीन आणि झूमबद्दल जे गैरसमज सध्या पसरत आहेत ते निराशाजनक आहेत” असं म्हटलं आहे. “आमची भारतीय बाजारावर पकड निर्माण होत असतानाच झूमबाबत काही गोष्टींबद्दल गोंधळ उडाला आहे. आम्हाला यातून बाहेर यायचं आहे”, असं सांगत झूम ही अमेरिकी कंपनी असल्याचं शंकरलिंगम यांनी म्हटलंय.
“भारत आधीपण महत्त्वाचं मार्केट होतं आणि यापुढेही आमच्यासाठी ते महत्त्वाचं मार्केट असेल. पुढील पाच वर्षांमध्ये भारतात महत्त्वाची गुंतवणूक करण्याची आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आहे” असं शंकरलिंगम यांनी सांगितलं. दरम्यान, भारताने ५९ चिनी अॅप्स बॅन केल्यानंतर झूम अॅपवरही बंदीची मागणी होत होती. त्यावर झूम ही अमेरिकी कंपनी असल्याचं सांगत शंकरलिंगम यांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने जिओमिट हे नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप लाँच केल्यानंतर आता झूमला भारतीय बाजारात चांगलीच टक्कर मिळणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App