Shubhmangal Vivah Yojana


Shubhmangal Vivah Yojana Maharashtra

Shubhmangal Vivah Yojana Maharashtra Details and Apply Process are given here. The main objective of this scheme is that the poor farmers / agricultural laborers should not be burdened financially for the marriage ceremony of their daughter, they should not take loans for it. By having a registered marriage, the couple does not need to depend on any voluntary organization and there is no need to wait for the date of the mass marriage ceremony. A registered marriage can be done in a simple ceremony at low cost. The Shubmangal Collective Registered Marriage Scheme will now be implemented through the District Planning and Development Committee. A subsidy of Rs.10,000 per couple for the marriage of girls from such family will be given in the name of the mother of the bride, in the name of the father if the mother is not alive and in the name of the bride if both the parents are not alive. Also, an incentive grant of Rs 2,000 per couple will be given to the voluntary organization that organizes mass marriages to meet the expenses incurred on the organization of marriages, related expenses of marriage ceremony and marriage registration fees, informed the District Women and Child Development Department.

Online Marriage Certificate Apply Here

Shubhmangal Vivah Yojana

मुलीच्या विवाहासाठी शुभ मंगल सामूहिक विवाह योजना

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या मुलीच्या सामूहिक विवाहासाठी शुभ मंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. गरीब शेतकरी / शेतमजूर यांच्यावर मुलीच्या विवाहाच्या सोहळ्याचा आर्थिक बोजा पडू नये, त्यासाठी त्यांनी कर्ज घेऊ नये हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

  1. शुभ मंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा एक लाख रूपये आहे.
  2. या योजनेंतर्गत शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपी रूपये दहा हजार एवढे अनुदान वधूच्या आईच्या नावाने, आई हयात नसल्यास वडिलांच्या नावाने व आई वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते.
  3. तसेच सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस दोन हजार रूपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन विवाह समारंभाचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येतो.

Eligibility for Shubhmangal Vivah Yojana Maharashtra

  1. वधू ही महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक अधिवासी असावी.
  2. विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षे यापेक्षा कमी असू नये.
  3. पात्र ठरण्यासाठी वधुचे कुटुंबाचे वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा रुपये एक लाख इतकी राहिल.
  4. विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षे यापेक्षा कमी असू नये.
  5. अशा कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे दहा हजार रुपये अनुदान वधुच्या आईच्या नावाने, आई हयात नसल्यास वडिलांच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने देण्यात येणार आहे. तसेच

Terms & Conditions

या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे –

  1. विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असावी.
  2. एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान ५ व कमाल १०० जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी असून वर्षात दोनदाच सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त विवाह सोहळे आयोजित केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय अनुदान मिळणार नाही.
  3. तसेच स्वयंसेवी संस्थेने योजनेची अटी शर्तीप्रमाणे सर्व कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अर्जासह सादर करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
  4. विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे संबंधित स्वयंसेवी संस्थेस बंधनकारक राहील.
  5. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दाम्पत्ये पात्र राहणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत आहेत.
  6. वधू – वरांना प्रथम विवाहासाठीचे हे अनुदान पुनर्विवाहाकरिता अनुज्ञेय राहणार नाही. तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील.
  7. या सुधारीत योजनेंतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन विवाह करतील, त्यांनाही रूपये दहा हजार देण्यात येईल.

आवश्यक कागतपत्रांची यादी:

  1. अर्जदार यांचा विहीत नमूण्यात अर्ज
  2. बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबत वर/वधू यांनी लिहुन द्यावयाचे विहीत नमूण्यात प्रतिज्ञापत्र.
  3. जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत.
  4. महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचा पुरावा.
  5. लाभार्थ्याचे पालक हे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधीत शेतकऱ्याच्या जमीनीचा 7/12 चा उतारा व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला
  6. लाभार्थ्याचे पालक हे शेतमजूर असल्याबाबत संबंधीत गावातील तलाठी / ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला
  7. वधु वराचे आधार कार्ड
  8. पालकाच्या बँक पासबुकची झेरॉक्स
  9. अविवाहीत प्रमाणपत्र (वधु व वर)
  10. उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वधुच्या वडीलांचे / आईचे)
  11. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  12. आधार कार्ड वधुच्या आईचे

Required Documents Lists for Shubhmangal Vivah Yojana

  1. Application in prescribed form by the applicant
  2. Affidavit in written form to be written by the bride/groom regarding non-violation of Child Marriage Prevention Act and Dowry Prevention Act.
  3. Copy of birth registration certificate or school leaving certificate as proof of date of birth.
  4. Proof of Domicile of Maharashtra State.
  5. Copy of 7/12th of the land of the concerned farmer as proof that the parents of the beneficiary are farmers and residence certificate of Gram Sevak / Talathi if resident of that village.
  6. Certificate of Talathi / Gram Sevak of the concerned village and resident certificate of Gram Sevak / Talathi if the beneficiary’s parents are agricultural labourers.
  7. Aadhaar card of bride and groom
  8. Xerox of bank passbook of the parent
  9. Unmarried Certificate (Bride and Groom)
  10. Income certificate (of bride’s father / mother)
  11. Marriage Registration Certificate
  12. Aadhaar card of bride’s mother

How to Apply Shubhmangal Vivah Yojana

  1. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी बँकेची माहिती, बँक शाखा, खाते क्रमांक, इत्यादींची माहिती अर्जात नमूद करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करावे.
  2. स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत.
  3. राज्यात ही सुधारीत शुभ मंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते, तर या योजनेची अंमलबजावणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते. तरी गरीब शेतकरी, शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरिता या योजनेचा लाभ घ्यावा.
Complete Details

 



6 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Shubhmangal Vivah Yojana

  2. Test22
  3. Sonu says

    Yojana kse prapt karayche

  4. Test22
  5. Priyanka Dhannu Parate says

    He yojna aply ks karycha

  6. Test22
  7. Priyanka Dhannu Parate says

    माझा पण लग्न आहे ह्या वर्षी मला पण है योजना प्राप्त कऱ्यची आहे मला बाबा नाही

  8. Test22
  9. Shivani suresh gurav says

    Hi yojana apply kashi karaychi ethe tr from bharayala kahi nhii tr…kaise kare

  10. Test22
  11. Kumkum says

    Maza mulich lghan 29 nov la ahe mla paise payjet

Leave A Reply

Your email address will not be published.