महाराष्ट्र राज्यातील होतकरू उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत राज्यातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी “योजना दूत भारती” योजने अंतर्गत एकूण ५०,००० योजना दूतांची भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम योजना दूतांचे असेल. या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, योजना दूतांना दरमहा १०,००० रुपये वेतन दिले जाईल. हि आपल्या साठी एक नोकरीची संधीच आहे. राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडू काही तरुण-तरुणींची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायच्या आहेत. या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रतिमहिना 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे. सरकार राज्यभरातून अशा 50 हजार योजनादूतांची निवड करणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकार अंतर्गत 50 हजार तरुणांना नोकरीची संधी! पात्रता, कागदपत्रे, कामे, निवड प्रक्रिया…
“योजना दूत” बनण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स अनुसरा:
1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा, लिंक खाली दिलेली आहे.
2. नोंदणी करा: वेबसाइटवर नोंदणीसाठीचा फॉर्म भरा. आवश्यक असलेली माहिती जसे की नाव, संपर्क तपशील, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती भरा.
3. माहिती व दस्तऐवज जमा करा: अर्ज करताना तुमची शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
4. अर्ज सादर करा: सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यावर अर्ज सादर करा.
5. तपासणी आणि मुलाखत: अर्जाची तपासणी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत किंवा पुढील प्रक्रिया होईल.
6. निवड: अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडलेले उमेदवार “योजना दूत” म्हणून नियुक्त केले जातील आणि त्यांना कामाबाबतचे मार्गदर्शन दिले जाईल.
लक्षात ठेवा मित्रानो, तुम्ही अर्ज करताना शासकीय सूचनांचे आणि वेळापत्रकाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
आता जाणून घेऊया निवड प्रक्रिया, निकष आणि फायदे
इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजनादूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँख खात्याचा तपशील, असणे गरजेचे आहे. उमेदवारांना योजनादूतच्या https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















