YCMOU Exam 2026
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षेला येत्या बुधवार (दि. २७ मे) पासून सुरुवात होणार आहेत. या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त व्हावी, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर एआय आधारित सीसीटीव्ही देखरेख प्रणाली राबवली जाणार आहे. हा उपक्रम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.
उन्हाळी सत्र परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ५५८ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तीन स्तरांवर कठोर देखरेख ठेवण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक ८४ परीक्षा केंद्रांवर प्रत्येक वर्गखोलीत एआय आधारित इंटेलिजेंट कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे केवळ रेकॉर्डिंग करणार नाहीत, तर संशयास्पद हालचाली, असामान्य वर्तन किंवा गैरप्रकार ओळखण्याची क्षमता असलेल्या एआय
अल्गोरिदमने सुसज्ज असतील. प्रश्नपत्रिका डाउनलोड करून डिजिटल प्रिंट काढण्यापासून ते उत्तरपत्रिका जमा करणे, सील करणे आणि सुरक्षित ठेवण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्हीची निगराणी राहील.
या उपक्रमामुळे परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल, असे असा विश्वास कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. मुक्त विद्यापीठात दूरस्थ शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी विविध पार्श्वभूमीतून येतात. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि शंकामुक्त वातावरण निर्माण करणे, याला विद्यापीठाचे प्राधान्य राहिले आहे.
एआय तंत्रज्ञानामुळे मानवी देखरेखीची गरज कमी होईल आणि रिअल टाइम अलर्ट्सद्वारे गैरप्रकार तत्काळ रोखता येतील. प्रायोगिक यशस्वी झाल्यास भविष्यात सर्व ५५८ केंद्रांवर ही प्रणाली विस्तारित केली जाईल. विद्यापीठाने परीक्षा केंद्रप्रमुख, निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचेही नियोजन केले आहे.
या निर्णयामुळे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांची विश्वासार्हता वाढेल आणि पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांशी तुलना करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनीही नियमांचे पालन करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
YCMOU Exam 2026
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेला नांदेड विभागीय केंद्रातंर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर दि. ७ जानेवारीपासून प्रारंभ झाला असल्याची माहिती नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली. दरम्यान, दि. ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तसेच दि. १४, दि. १५ व दि. १६ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा सार्वत्रिक महानगरपालिका निवडणूक आणि मतमोजणी असल्याने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदरील पेपर विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार दि. २२, दि. २३, दि. २४ व दि. २५ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्त विद्यापीठाच्या या परीक्षा दि. ७ ते दि.२७ जानेवारी या कालावधीत होणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नांदेड विभागात एकूण २३ हजार २३४ परीक्षार्थी परीक्षा देत असून चारही जिल्ह्यांतील ३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी परीक्षा केंद्रावर एकूण ३५ बहिस्थ पर्यवेक्षक (बैठे पथक) तसेच ७ दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांना विद्यापीठाच्या वतीने विनंती पत्र देण्यात आले आहे. सर्व ३५ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत परीक्षा पार पडत असून आतापर्यंत दक्षता पथकाच्या तपासणीत गैरप्रकार करणाऱ्या ८३ विद्यार्थ्यांवर कार्यवाही करण्यात आल्याचेही डॉ. कलेपवार यांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या सत्र, वार्षिक परीक्षा तसेच मे २०२५ च्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचीही लेखी परीक्षा आज बुधवार (दि. ७ जानेवारी) पासून सुरू होणार आहे. यासाठी राज्यातील २६९ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेसाठी १ लाख ४९ हजार ८७२ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील १२१ अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा ७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. मात्र, राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विद्यापीठातील अनेक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देखील मतदान प्रक्रिया पार पाडायची आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता विद्यापाठाने १४ ते १६ दरम्यान होणाऱ्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलले आहेत. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरदार, व्यावसायिक, पोलिस, सैनिक, गृहिणी, शिक्षक, कामगार अशा समाजातील विविध घटकांतील असून या परीक्षेमध्ये विविध विषयाच्या ६ लाख ७९ हजार ९५४ उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. परीक्षा सुरळीत व पारदर्शकपणे होण्यासाठी विद्यापीठाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग ‘क’ परीक्षा रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी होणार असून तसेच महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यामुळे १४ ते १६ जानेवारी २०२६ रोजी नियोजित असलेल्या विद्यापीठाच्या परीक्षांचे आयोजन पुढे ढकलले आहे.
विद्यापीठाच्या दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान, आरोग्यविज्ञान, निरंतर शिक्षण, संगणकशास्त्र, कृषी विज्ञान शाखेतील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयानुसार दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या पदवीला आता नियमित पद्धतीने चालणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाची समकक्षता दिली आहे. त्यामुळे दूरस्थ किंवा ऑलाइन पद्धतीने शिक्षण घेण्याला विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयात पूर्ण वेळ पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्यांना, या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण घेता येते. शिक्षण मुक्त विद्यापीठाकडून चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचे शुल्क तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होते. नोकरी किंवा काम करताना, शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होते .
या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारी आणि रविवारी अभ्यास केंद्रात विषयनिहाय मार्गदर्शन केले जातेः शैक्षणिक साहित्यही पुरविण्यात येते. या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमी शुल्कात चांगले शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे, असे विद्यापीठाच्या प्रशासनाने सांगितले. या वेबसाइटवर माहिती उपलब्ध मुक्त विद्यापीठाच्या विविध दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील. त्यानंतर अभ्यासक्रमानुसार अभ्यास केंद्र निवडण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मुक्त विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना जवळच्या अभ्यास केंद्रात आणि विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात मिळेल.
YCMOU MBA CET 2021: The schedule for the online entrance exams for this course, which is run by an open university, has been announced. Accordingly, the application process of students has also started. As per the instructions of the university, students have been given till September 14 to apply online for the online entrance examination for the MBA course. Further details are as follows:-
मुक्त विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या या शिक्षणक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मुक्त विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या या शिक्षणक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देण्याची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे माहिती जाहीर केली जाणार आहे. तसेच प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित अभ्यास केंद्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
The date of the CET has not been announced by the university yet and a separate online notification will be released. The university has also extended the deadline for online admission to the BEd Special Education course. Students can apply online till August 31 for this course.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















