डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि संलग्न महाविद्यालयातील १७७ अभ्यासक्रमांच्या ३ लाख ५५ हजार ९९२ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली आहे.

विद्यापीठातील अनेक विद्यार्थी हिवाळी सत्र परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर विद्यापीठाने निकाल जाहीर केला असून, दुसऱ्या सत्रातील परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. त्या ४० दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह २०१४ पासून प्रलंबित असलेल्या परीक्षा घेतल्या आहेत. १७९ पैकी १७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असले तरी एम.एस्सी केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सच्या निकालाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
राज्यातील निवडणुकीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यामुळे निकाल उशिरा लागला. परीक्षेच्या नव्या पद्धतीनुसार लेखी परीक्षेसाठी ३० आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण आहेत. लेखी परीक्षेत १० गुणांचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, ५ गुणांचे दोन प्रश्न आणि १० गुणांसाठी एक प्रश्न असा स्वरूप ठेवण्यात आला आहे. उत्तरपत्रिका किमान १६ पानांची असावी, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















