JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC अंतर्गत PSI, STI आणि ASO रिक्त पदांच्या संख्येत वाढ होणार !-Will MPSC Vacancies Rise?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांना पाठिंबा देत शरद पवारांनी सरकारला जागा वाढवण्याचं ठाम आवाहन केलं आहे. “४८० जागा पुरेशा नाहीत – प्रशासनात हजारो पदं रिक्त आहेत, मग एवढ्याच जागा का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर थेट चर्चा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

Will MPSC Vacancies Rise?

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी काही विद्यार्थी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ येथे गेले होते. त्यांनी थेट त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं – PSI, STI आणि ASO पदांसाठी जाहीर झालेल्या ४८० जागा अपुऱ्या आहेत, दोन वर्षांनी परीक्षा होत असताना वयोमर्यादा वाढवली असली तरी जागा वाढवणं तितकंच गरजेचं आहे.

पवारांनी सोशल मीडियावरून माहिती दिली की, ही मागणी योग्य असून, शासन व आयोगाला जागा वाढवण्यात कुठलीही अडचण नाही. “मी स्वतः मुख्यमंत्री व आयोगाशी यावर बोलणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत व त्या मान्य होणं गरजेचं आहे.”

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या:

  1. गट ब व क २०२४ साठी अधिक जागा उपलब्ध करून द्या

  2. एक्साईज SI पदांमध्येही जागावाढ करा

  3. सर्व परीक्षा वेळेवर घ्या

  4. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक नको

  5. आयोगाचा कारभार पारदर्शक व योग्य पद्धतीने चालावा

  6. क्लर्क परीक्षेचा निकाल लवकर लावा

  7. EWS विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकला

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड