कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या; सध्या या क्षेत्रातून १.२५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे | Waste Management Job Vacancy
Waste Recycling Job Vacancy
Waste Management Job Vacancy: देशात दररोज मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे उत्पादन होत आहे. शहरांमधून दररोज सुमारे तीन लाख टन कचरा निर्माण होतो. त्यातील केवळ २० टक्के कचऱ्याचेच पुनर्वापर (रिसायकलिंग) करता येते. सध्या कचरा रिसायकलिंग उद्योगाचा वार्षिक महसूल ६० हजार कोटी रुपये आहे. २०३० पर्यंत हा महसूल तीन लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सध्या या क्षेत्रातून १.२५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे. येत्या सहा वर्षांत या उद्योगामुळे ११ लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रिसायकलिंग उद्योगाशी संबंधित रिसस्टेनिबिलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मसूद मलिक यांनी सांगितले की, देशातील कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणामुळे रिसायकलिंग उद्योगासाठी भविष्यात विस्तार आणि गुंतवणुकीसाठी खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कामगारांचे आरोग्य जपण्याचे मोठे आव्हान
■ कचरा व्यवस्थापन उद्योग वेगाने विकसित होत आहे. यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाढत्या धोकादायक कचऱ्यामुळे मोठे आव्हान सध्या मानवजातीमसोर उभे राहिले आहे.
■ कचऱ्याची विल्हेवाट लावताना यात काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकाराचा धोका निर्माण होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे
■ कचरा जमा करणे, त्याची शास्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्रक्रिया करण्यायोग्य कचऱ्याचे विलगी- करण करणे याचे योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे.
सरकारने राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत कमालीची जागरूकता वाढली आहे. त्यांच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. बदललेल्या या मानसिकतेचा लाभ देशातील रीसायकलिंग उद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला आहे