मोठी बातमी ! न्याय विभागात टंकलेखकांच्या ५ हजार २२३ पदांची निर्मिती, भरती लवकरच होणार? Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2025
Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2025
Vidhi Nyay Vibhag Nyayadhish Bharti 2025
राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार ५ हजार २२३ टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन २ हजार ८६३ नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत तसेच यापूर्वीची २ हजार ३६० पदे मंजूर आहेत. इचलकरंजी आणि जालना या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या महापालिकांना वस्तू व सेवाकर भरपाईपोटी अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुढील पाच वर्षांत इचलकरंजी महापालिकेस ६५७ कोटी व जालना महापालिकेस ३९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल.
या सोबतच खालील महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेस ७५ अनिवासी विद्यार्थी संख्येस अनुदान तत्त्वावर ‘विशेष बाब’ म्हणून मान्यता,
- नागपूरमधील पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या करारनाम्यातील अटी व शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता.
- महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या १,३५१ पदाच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता.
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास मान्यता.
- राज्यातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषि अधिकारी’ व ‘सहाय्यक कृषि अधिकारी’ असा बदल करण्याच्या निर्णयास मंजुरी.
Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2025: राज्याच्या विधि व न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात गट-अ पदांची १९४ पदे मंजूर आहे. परंतु यात अनुसूचित जमातीसाठी एकही पद राखीव नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या विभागात एकूण मंजूर पदे २ हजार २१८ आहे. यातील अनुसूचित जमातीसाठी १४६ पदे राखीव आहे. अनुसूचित जमातींच्या भरलेल्या पदांची संख्या ८३ आहे. यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या ६६ आहे. १७ जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अद्यापही अनुसूचित जमातींच्या ६३ पदांचा अनुशेष शिल्लक असल्याची माहिती माहिती अधिकारात पुढे आली आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी आणि अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या निरंक दाखविण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ६ जुलै २०१७ची अंमलबजावणी राज्यात होत नसल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ही माहिती आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी माहिती अधिकारात मागितलेली आहे. त्यानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अशी आहेत मंजूर, रिक्त अन् अधिसंख्य पदे
विधि व न्याय विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयात एकूण गट-अ संवर्गाची १९४ पदे मंजूर आहे. यात अनुसूचित जमातीची राखीव पदे, भरलेल्या पदांची संख्या, जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्यांची संख्या, रिक्त पदे या सर्व रकान्यात कोणतीही नोंद नाही.
• गट ब संवर्गात मंजूर पदे ३०६ आहे.
अनुसूचित जमातीची राखीव पदे २१ आहे, तर त्यापैकी भरलेल्या पदांची संख्या ११ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या दोन आहे. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेल्यांची संख्या आणि रिक्त पदे दाखविलेली नाहीत.
गट क संवर्गाची मंजूर पदे १ हजार २४९ आहे. त्यापैकी अनुसूचित जमातीची राखीव पदे ९३ आहे. भरलेल्या पदांची संख्या ५४ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या ४८ आहे. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेली आणि रिक्त झालेली पदे दाखवण्यात आलेली नाहीत.
■ गट ड संवर्गाची मंजूर पदे ४६९ आहे. यापैकी अनुसूचित जमातीसाठी राखीव पदे ३२ आहे. भरलेली पदे १८ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या १६ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेले आणि रिक्त पदे दाखवण्यात आलेली नाही.
Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2024: राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची (न्यायाधीश) अतिरिक्त नवीन 2 हजार 863 पदे आणि त्यांच्यासाठी साह्यभूत कर्मचाऱ्यांची 11 हजार 64 नवीन पदे व बाह्ययंत्रणेद्वारे 5 हजार 803 पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची (न्यायाधीश) अतिरिक्त नवीन 2 हजार 863 पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भात विधी व न्याय विभागाचे उपविधी सल्लागार व उपसचिव महेंद्र जाधव यांनी शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. परिपत्रकांनुसार राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (सिनियर डिव्हिजन) तथा प्रथमवर्ग दंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) या प्रवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त नवीन 2 हजार 863 नियमित पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
न्यायधीशांची अतिरिक्त नवीन पदे निर्माण करण्याबाबत नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टम्स कमिटीच्या (एनसीएमएससी) अहवालाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्यातील न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्याची (न्यायाधीशांची) आवश्यक संख्या निश्चित करून अतिरिक्त नवीन पदे निर्माण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश होते. त्या अनुषंगाने याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
समितीच्या अंतरिम अहवालानुसार युनिट सिस्टीमच्या आधारे प्रलंबित व नवीन दाखल होणारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी लागणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या स्टेट कोर्ट मॅनेजमेंट सिस्टम समितीने 2018 मध्ये 3 हजार 211 न्यायिक अधिकाऱ्याची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला होता. त्यानंतर हायकोर्टात वर्ष 2022 मध्ये दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील कोर्टाच्या आदेशात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त नवीन पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानुसार हायकोर्टाने सदर पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला होता. त्यानुसार न्यायाधीशांची अतिरिक्त नवीन पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे