JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर! विदर्भात रोजगाराची मोठी संधी, २३ देशातील राजदूत व व्यापार प्रतिनिधी नागपूरात! – vidarbha job vacancy

Vidarbha Job Vacancies 2026 – Hi Friends,Latest Update for joob Seekers in Vidarbha! its really great news for you all.. For the first time, ambassadors and trade representatives from more than 23 countries will participate in the international business conference of the ‘Advantage Vidarbha 2026 – MP Industrial Festival,’ which will be held from February 6 to 8 at the Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University campus on the Ambazari-Amravati road in Nagpur. This initiative will provide significant export opportunities for industries in Vidarbha and local businesses, informed Ashish Kale, President of the Association for Industrial Development, at a press conference on Monday. ​​Speaking at the press conference held at Hotel Tuli, Kale said that ‘Advantage Vidarbha’ aims to provide an international platform for the industrial development of Vidarbha. Based on the theme of ‘Strengthening Development,’ this festival will highlight Vidarbha as a strong and emerging center on India’s industrial map. The international business conference will be inaugurated on Saturday (February 7) at 11 AM by Union Minister Nitin Gadkari.

नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी–अमरावती मार्गावरील परिसरात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२६ – खासदार औद्योगिक महोत्सवा’तील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेकरिता प्रथमच २३ हून अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून विदर्भातील आणि स्थानिक उद्योगांना निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल तुली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काळे म्हणाले की, विदर्भाच्या औद्योगिक विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवण्यासाठी ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ आहे. ‘विकासाला बळ’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव भारताच्या औद्योगिक नकाशावर विदर्भाला एक सक्षम व उदयोन्मुख केंद्र म्हणून अधोरेखित करणार आहे. या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे उद्घाटन शनिवारी (७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

Vidarbha Job Vacancies 2026

सायंकाळी पाच वाजता दक्षिण आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन, रशिया, चीन तसेच आफ्रिकी देशांवरील विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये संबंधित देशांचे राजदूत अथवा व्यापार प्रतिनिधी त्यांच्या देशातील गरजा, आयातक्षम वस्तू आणि व्यवसायाच्या संधींबाबत विदर्भातील उद्योजकांना मार्गदर्शन करतील. परिषदेत रशिया, चीन, ब्राझील, इजिप्त, टोगो, गयाना, बेनिन, उरुग्वे, नायजेरिया, झांबिया आणि व्हेनेझुएला यांच्यासह एकूण २३ देशांचा सहभाग राहणार आहे. सध्या या देशांमध्ये भारतातून, विशेषतः विदर्भातून कृषी क्षेत्रातील तांदूळ, वीज वहन मनोरे, वस्त्रोद्योगातील सूत तसेच पोलादाची निर्यात केली जाते. या वस्तूंच्या निर्यातीत वाढ होण्यासोबतच नव्या उत्पादनांसाठीही संधी उपलब्ध होतील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी थेट संवाद साधून आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचा मार्ग खुला होईल. त्यातून या भागात मोठ्या प्रमाणावर सगळ्याच क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असेही काळे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अशोक गोयल, अनूप खंडेलवाल, संजय गुप्ता, राजेश बागडी, राजेश रोकडे, रिना सिन्हा आणि शिवराव उपस्थित होते.विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना यापूर्वी तयार करण्यात येणारे संगणक कार्यक्रम केवळ निर्यातीसाठीच वापरता येत होते. देशांतर्गत वापरासाठी त्यावर मर्यादा होत्या. ही अडचण असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात आवश्यक सुधारणा झाल्याने आता हे संगणक कार्यक्रम देशांतर्गत वापरासाठीही उपलब्ध होऊ शकेल. या बदलामुळे विदर्भातील लहान माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर विदर्भात बऱ्याच लहान आयटी कंपन्या आहे. त्यांना ‘ॲडव्हांटेज विदर्भ’च्या माध्यमातून येथे येणाऱ्या २५ विकसनशील देशांमध्ये या क्षेत्रात व्यवसायवृद्धीच्या मोठ्या संधी असल्याचेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड