राज्यात ६००० पशुवैद्यकांची गरज !

Veterinary Doctor bharti Maharashtra

Veterinary Doctor bharti Maharashtra – राज्यात ३ कोटी ३० लाख जनावरे असून पाच हजार जनावरांच्या मागे एका डॉक्टरच्या (पशुधन विकास अधिकारी) नियुक्तीच्या निकषानुसार राज्याला सहा हजार डॉक्टरांची गरज आहे. असे असताना राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणात होरपळ होत आहे. दुसरीकडे अनेक वर्षांनंतर या पदासाठी डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला आहे.

The state needs 6,000 veterinarians

‘व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या १९८४ च्या कायद्यानुसार, पाच हजार जनावरांमागे एक डॉक्टर असावे असा निकष आहे. २०१९-२०च्या एका संशोधनानुसार, राज्यात ३ कोटी ३० लाख जनावरे असून निकषांनुसार ६००० पशुवैद्यकांची गरज आहे. मात्र, राज्यात केवळ २१९२ पदांना मंजुरी आहे. यापैकी १७६४ पदांची प्रत्यक्ष भरती करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २३ ऑगस्ट २०१९ रोजी ४३५ पदांसाठी जहिरात देण्यात आली होती. यासाठी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील हजारो पदवीधरांनी २२ डिसेंबर २०१९ ला परीक्षाही दिली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दरवर्षी साथ रोगांमुळे प्राण्यांना होणाऱ्या आजाराचे प्रमाण खूप आहे. गावपातळीवर आरोग्य सुविधेची सोय नाही. चार-पाच गाव मिळून एक पशुधन विकास अधिकारी असतो. त्यामुळे गुरे मृत्युमुखी पडत आहेत. जनावरांची उत्कृष्ट पैदास व्हावी म्हणून कृत्रिम रेतनासाठी शेतकरी बांधवांना दुभत्या जनावरांची सेवाशुश्रूषा करण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड