JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याची मागणी! – Veterinary Department Vacancy

Veterinary Department Vacancy : The veterinary hospital in Karmala taluka has inadequate officers and staff. This is causing a lot of problems to farmers. Maharashtra Legislative Council MLA Ranjitsinh Mohite-Patil has written to Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe-Patil, demanding immediate filling up of vacant posts of officers and staff at the veterinary hospital in Karmala taluka.

 

करमाळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात अपुरे अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. करमाळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात तत्काळ अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्याची मागणी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

मोहिते-पाटील म्हणाले, करमाळा तालुक्यात प्रथम श्रेणीचे ९ व द्वितीय श्रेणीचे ९ पशुवैद्यकीय दवाखाने असून, यातील ७ पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या ५३ मंजूर पदांपैकी १७ पदे रिक्त आहेत. या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित करत रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची मागणी केली.

पदे रिक्त असल्याने दवाखान्यात पशुधनांवरील मोठ्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय सामग्रीच्या उपलब्धतेविना शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनावर खासगी पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत. रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.



As many as 37 posts are vacant in the veterinary department – जिल्हा पशु वैद्यकीय विभागातील जिल्ह्यात श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ४६ एवढी आहे. या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी वर्ग २ दर्जाच्या अधिकाऱ्यांची ४६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १३ पदे कार्यरत असून, तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. त्यात धुळे तालुक्यात १, साक्री तालुक्यात १५, शिंदखेडा तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ८ पदे रिक्त आहेत. तर श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ७१ आहे. या ठिकाणी ७१ पशुधन पर्यवेक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ३४ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तर तब्बल ३७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये धुळे तालुक्यात १६, साक्री तालुक्यात ५, शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ७ पदे अनेक वर्षांपासुन रिक्त असल्याने अद्याप प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पशुपालकांची मोठ्या प्रमाणात गैरसाेय सहन करण्याची वेळे येते.

सोर्स : लोकमत

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड