डॉक्टरांची तातडीने भरती
Vasai Virar Doctors Bharti 2020
Vasai Virar Doctors Bharti 2020 – वसई-विरार महापालिकेने मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी एमबीबीएस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची मात्र कमतरता जाणवत होती. यासाठी पालिकेने आरोग्यसेवेतील विविध पदांसाठी जाहिराती काढल्या होत्या. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांची तातडीने भरती केली आहे. यामध्ये तत्काळ ३८ डॉक्टरांना कामावर भरती करण्यात आले.
वसई-विरार महापालिकेकडे सध्या नालासोपारा येथे ८० खाटांचे तुळींज रुग्णालय आणि वसईत ७० खाटांचे सर डी. एम. पेटीट अशी दोन रुग्णालये आहेत. याशिवाय २१ आरोग्य केंद्रे, ९ दवाखाने, तीन माता बालसंगोपन केंद्रे आहेत. याशिवाय पालिकेने आणखी तीन माता बालसंगोपन केंद्रे, दोन आरोग्य केंद्रे तसेच ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता होती. यासाठी महानगरपालिकेने मागील महिन्यात ८१ एमबीबीएस आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पदांसाठी जाहिराती काढल्या. २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत पालिकेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष मुलाखती या पदासाठी झाल्या होत्या. त्यातच करोनाचे संकट देशावर कोसळल्यानंतर पालिकेची आरोग्यसेवा आणखी मजबूत करण्यासाठी मुलाखती घेतलेल्यांपैकी ३८ एमबीबीएस डॉक्टरांना तत्काळ कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील ११ डॉक्टर हे तत्काळ कामावर रुजू होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली.
पालिकेला मिळाले एमबीबीएस डॉक्टर (Mahanagar Palika MBBS Doctor Bharti)
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात ४५१ डॉक्टर आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. या विभागात ८६ बीएमएस डॉक्टर असून केवळ नऊ एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या पदावांर बीएएमएस डॉक्टरांनाच काम करावे होते. आता पालिकेला एमबीबीएस डॉक्टर मिळाले आहेत.
२७३ जणांचे घरात विलगीकरण
बाहेरील देशातून आलेल्या अनेक नागरिकांचे घरात विलगीकरण करण्यात आले आहे. वसई-विरारमध्ये अशा २७३ जणांचे घरातच विलगीकरण करण्यात आले. तसेच घरात विलगीकरण शक्य नसल्यास त्यांच्यासाठी महापालिकेमार्फत विलगीकरण कक्ष उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी पालिकेने ११ हॉटेल, रिसॉर्टमध्ये ४८८ खोल्या उपलब्ध केल्या आहेत. पालिका हद्दीत असलेल्या ३५ खोल्यांमध्ये ३५ नागरिकांना विलग करून ठेवण्यात आले. तसेच वसईत आढळून आलेल्या एका रुग्णावर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या कुटुंबालासुद्धा विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पालिका रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी तत्काळ या रिक्त असलेल्या जागांवर एमबीबीएस डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे.