वनविभागाची सरळसेवा भरती प्रक्रिया पुढे ढकलली
वनविभागासाठी वनरक्षक सरळसेवा भरती प्रक्रिया पूरस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित तारखानंतर कळवल्या जातील, असे वनविभागातर्फे कळवण्यात आले आहे.
वनविभागातील वनरक्षक भरती प्रक्रिया 2019 अंतर्गत, महापरीक्षा मार्फत ऑनलाइन लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये पात्र उमेदवारांसाठी पुढील टप्प्यात कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप, धाव चाचणी, लेखी परीक्षा आणि धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करणे; याशिवाय 25/16 कि.मी. (पुरुष/ महिला) चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी घेणे, नियुक्ती आदेश निर्गमित करणे हे टप्पे वनवृत्त स्तरावरील प्रादेशिक निवड समिती मार्फत आयोजित करण्यात आले होते. त्याबाबत उमेदवारांना विविध माध्यमातून कळवण्यातही आले होते. तथापि, राज्यातील पूर परिस्थिती आणि दळणवळणाची असुविधा लक्षात घेता वनरक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे सध्यास्थितीत सुकर रितीने पार पाडणे शक्य नसल्याने सदर प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App