राज्यातील समाजकल्याण विभागात गृहपाल, महिला गृहपाल यांसह इतर विविध रिक्त पदांची भरती लवकरच होणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत मार्च महिन्यात परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच पुढील प्रक्रिया राबवली जाईल.

राज्यात समाजकल्याण विभागाच्या शहर आणि तालुका स्तरावर वसतीगृहे कार्यरत आहेत. या वसतीगृहांमध्ये ५० हजारांहून अधिक विद्यार्थी राहत असूनही अनेक ठिकाणी गृहपालांची तसेच इतर पदांची कमतरता आहे. परिणामी, एका गृहपालाला अनेक वसतीगृहांचे काम पाहावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे.
याशिवाय, लिपिक आणि शिपाई ही पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त असून, त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी डिसेंबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा मार्च महिन्यात होणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे. लेखी परीक्षेनंतर त्वरित पुढील निवड प्रक्रिया राबवून रिक्त पदे भरली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















