जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातील अनेक पदे रिक्त, नवीन पदभरती..! – Critical Situation of Vacant Posts in the Irrigation Department!
Critical Situation of Vacant Posts in the District Council Minor Irrigation Subdivision!
राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे ग्रामीण भागातील जलसंधारण आणि लघु पाटबंधारे प्रकल्प प्रभावीपणे राबविले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागात अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत (Vacant Posts in the Irrigation Department). त्यामुळे तालुक्यातील विकासकामांची गुणवत्ता तपासणे कठीण झाले असून, योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करायची, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
ग्रामीण भागातील लघु पाटबंधारे योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन मागणी नोंदवणे आवश्यक असते. तसेच, योजना पूर्ण झाल्यानंतर तिचे संपूर्ण व्यवस्थापन आणि देखभाल ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असते. सध्या जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत जलयुक्त शिवार, बंधारे दुरुस्ती, गाळमुक्त धरण, आणि राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे काम योग्य प्रकारे पार पाडणे मोठे आव्हान ठरत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कळमेश्वर तालुक्यात विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच शाखा अभियंत्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत, पण दुर्दैवाने ही सर्वच पदे रिक्त आहेत. तसेच, कार्यालयीन कामकाजासाठी मंजूर असलेले वरिष्ठ सहायकाचे पदही रिक्त आहे. कनिष्ठ सहायकाच्या दोन मंजूर पदांपैकी एक पद रिक्त असून, परिचराच्या तीन मंजूर पदांपैकी एक जागाही भरली गेलेली नाही. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रतीक गजभिये आणि कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांवर संपूर्ण कामाचा भार पडला आहे.
वाहनचालक नसल्यामुळे चारचाकी वाहन निष्प्रयोजन!
उपविभागीय अभियंत्यांना विकासकामांच्या ठिकाणी वेळोवेळी भेट देता यावी यासाठी चारचाकी वाहन आणि वाहनचालक नियुक्त करण्यात आला होता. मात्र, मागील अनेक वर्षांपासून वाहनचालकाचे पद रिक्त असल्याने लाखो रुपयांचे वाहन जागेवरच निष्क्रिय बनले आहे. जर लवकरात लवकर चालकाची नेमणूक केली नाही, तर हे वाहन देखभाल अभावी भंगारात जाईल.
जि. प. लघु पाटबंधारे विभागाची प्रमुख कामे
लघु पाटबंधारे विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा खनिज विकास निधी, जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, अमृत सरोवर योजनेअंतर्गत नवीन बंधारे बांधणे, जुन्या बंधाऱ्यांचे नूतनीकरण, तलाव आणि नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण यांसारखी महत्त्वाची कामे केली जातात.
जलसंधारण अधिकारी पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे
उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदाच्या माध्यमातून या विभागाच्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, २०२० पासून आजपर्यंत हे पद पूर्णवेळ अधिकाऱ्यांऐवजी प्रभारी अधिकाऱ्यांकडेच सोपवले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२० पासून आतापर्यंत आठ प्रभारी अधिकाऱ्यांनी हे पद सांभाळले असून, सध्या उपविभागीय अभियंता योगेश इंगळे ३१ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
एकूणच, रिक्त पदांमुळे लघु पाटबंधारे विभागाच्या कामांवर मोठा परिणाम होत आहे. जर लवकरच रिक्त पदे भरली गेली नाहीत, तर अनेक महत्त्वाच्या योजना कागदोपत्रीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रिक्त पदांवर भरती करण्याची गरज आहे.