४१८ जागा – UPSC भरती २०२०- १२ वी उमेदवारांना संधी !

UPSC Recruitment 2020

UPSC NDA Recruitment 2020 – संघ लोक सेवा आयोग अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२० करिता एकूण ४१८ (NDA-३७०, NA-४८) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज दिलेल्या लिंक वरून मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२० आहे. लक्षात ठेवा ११ वीला असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाही.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीत हि भरती एकूण ३७० पदांची भरती होणार आहे. याअंतर्गत नौदलात ४८ पदांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा. तसेच भूतान, नेपाळ आणि तिबेटमधून १९६२मध्ये भारतात आलेल्या नागरिकांनाही या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. २८ जानेवारी २०२०पर्यंत हे अर्ज करता येणार असून लेखी परीक्षा १९ एप्रिल २०२० रोजी होणार आहे. या पदांसाठी इयत्ता १२वी पास असणं आवश्यक आहे. परीक्षा अर्जासाठी १०० रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एसएसबीच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. ही मुलाखत जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० दरम्यान होईल.

  • परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२०
  • पद संख्या – ४१८ जागा (NDA-३७०, NA-४८)
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
अ.क्र.पद नामयोग्यता
01राष्ट्रीय रक्षा अकादमी12th Class pass of the 10+2 pattern of School Education or equivalent
02नौसेना अकादमी12th Class pass of the 10+2 pattern of School Education or equivalent
  • फीस – रु. १००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

निवडप्रक्रिया :

एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी प्रवेशपरीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.

निगेटिव्ह मार्किंग :  PENALITY FOR WRONG ANSWERS:
Candidates should note that there will be penalty (Negative Marking) for wrong answers marked by a candidate in the Objective Type Question Papers.

एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यांत घेतली जाते. त्यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर ही दोन केंद्रे असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात, त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांचा वेळ असतो. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम असतो, तर सामान्य अध्ययन या पेपरमध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणतः तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी)मार्फत तब्बल पाच दिवसांच्या मॅरेथॉन मुलाखतीसाठी बोलावले जाते.

बोर्ड मुलाखत :

भारतीय सैन्य दलांत अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्प्यांत घेतली जाते.

पहिला टप्पा :

या टप्प्यास स्क्रीनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवडप्रक्रियेतून बाहेर पडतात

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


UPSC NDA Recruitment 2020

NDA 2020 Bharti Recruitment 2020 by UPSC Details are given above. Read all instructions given in marathi Carefully. The candidates applying for the examination should ensure that they fulfil all the eligibility conditions for admission to the Examination. Their admission at all the stages of the examination will be purely provisional subject to satisfying the prescribed eligibility conditions.

Mere issue of Admission Certificate to the candidate will not imply that his candidature has been finally cleared by the Commission.
Verification of eligibility conditions with reference to original documents is taken up only after the candidate has qualified for interview/Personality Test.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप