JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

यूपीएससीकडून नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ची तात्पुरती उत्तरसूची जाहीर – UPSC Examination Answer Key

UPSC Civil Services (Preliminary) Examination Answer Key

UPSC Examination Answer Key : The Union Public Service Commission (UPSC) has announced the answer sheets for the Civil Services (Preliminary) Examination 2026. Candidate can download Answer Key from below link.

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२६ची तात्पुरती उत्तरसूची (प्रोव्हिजनल आन्सर की) यूपीएससीने जाहीर केली. प्राथमिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आयोगाने प्रथमच तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांना ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाच्या upsconline.nic.in या संकेतस्थळावरील “ऑनलाइन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल” (QPRep) वापरता येणार आहे, उमेदवारांनी उत्तरासह संक्षिप्त स्पष्टीकरण आणि तीन स्रोतांमधील पुरावे सादर करणे आवश्यक असेल. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यूपीएससी दरवर्षी प्रशासकीय सेवा (आयएएस), परराष्ट्र सेवा (आयएफएस), पोलिस सेवा (आयपीएस) यांसह अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत नागरी सेवा परीक्षा घेते

यंदाची नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २४ मे रोजी दोन सत्रांत घेण्यात आली. सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत सामान्य अध्ययन (पेपर-१) आणि दुपारी २:३० ते ४:३० या वेळेत सिव्हिल सर्व्हिसेस अॅप्टिट्यूड टेस्ट पेपर घेण्यात आला. यंदा सुमारे ५.४९ लाख उमेदवारांनी ९३३ नागरी सेवा पदे आणि भारतीय वन सेवेतील ८० पदांसाठी परीक्षा दिली. सर्व हरकती विषयतज्ज्ञांकडून तपासल्या जातील. मात्र, अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

General Studies Paper – I 

General Studies Paper – II 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड