यूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच? काय म्हणाले मंत्री?

UPSC Civil Service Prelims Exam 2020

टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) देशभरात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. स्पर्धा परीक्षांसह बहुतांश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत सिव्हिल सर्व्हिसेसच्या पूर्व परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. ही परीक्षा देखील पुढे ढकलण्यात येईल की नाही हे उमेदवारांना जाणून घ्यायचे आहे. यूपीएससीने नागरी सेवा मुलाखत / व्यक्तिमत्त्व चाचणीचे वेळापत्रक निश्चित केले असले तरी पूर्वपरीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याबाबतच्या गोंधळासंबंधी ते बोलत होते. त्याचबरोबर त्यांनी नागरी सेवा पूर्व परीक्षा ३ मे नंतर घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.

कोणत्या परीक्षा लांबणीवर

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा, भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० यापूर्वीच स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा पुढे ढकलल्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आली आहे. यूपीएससीच्या संकेतस्थळावर सीएपीएफ परीक्षेच्या तारखांची घोषणा केली जाईल. एनडीए – २ च्या परीक्षेसंदर्भातील कोणत्याही निर्णयाबाबतची माहिती १० जून २०२० रोजी यूपीएससीच्या संकेतस्थळावर दिली जाणार आहे.

नागरी सेवा पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार आहेत. १६ एप्रिल रोजी यूपीएससीने हे स्पष्ट केले होते की पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. असा कोणताही निर्णय झाल्यास, त्याबाबतची माहिती यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल..


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड