सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांमध्ये संचालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास हा मुद्दा आल्याने तातडीने पदभरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित महाविद्यालयांची ऑनलाइन सेवा बंद करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. डी. डावखर यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे. विद्यापीठ कायद्याच्या तरतुदींनुसार, संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या नियमानुसार असणे आवश्यक आहे. दर्जेदार अध्यापन, प्रशिक्षण आणि संशोधन सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ महाविद्यालयांनी उपलब्ध करणे बंधनकारक आहे.
पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील महाविद्यालयांनी नियमित प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांची पदे भरण्याचे आदेश ११ जून २०२४ रोजी देण्यात आले होते. मात्र, अनेक महाविद्यालयांनी अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, विद्यापीठाने महाविद्यालयांना पदभरतीबाबत कारवाईचा इशारा दिला असला, तरी स्वतः विद्यापीठातही कुलसचिव, अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन संचालक यांसारखी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तसेच, शैक्षणिक विभागांमध्येही प्राध्यापकांच्या जागा भरलेल्या नाहीत.
या रिक्त पदांमुळे विद्यापीठातील कर्मचारी अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आधी स्वतःच्या पदभरतीवर भर द्यावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून पुढे येत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















