वैद्यकीय महाविद्यालयांना हिरवा कंदील! – जाणून घ्या
University Permission to Start Medical College
University Permission to Start Medical College : राज्यभरात नववी ते बारावीच्या वर्गांना सुरवात झालेली असताना आयुष मंत्रालयांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करायलादेखील हिरवा कंदील मिळाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर या संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अन्य ठिकाणी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी महाविद्यालये सुरू होणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाविद्यालयस्तरावर निर्णय घेण्याच्या विद्यापीठाच्या सूचना
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आयुष वैद्यकीय महाविद्यालये ४ जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भात कुठलीही हरकत नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या २४ डिसेंबरला आयुष मंत्रालयाला कळविले होते. त्यानंतर आयुष मंत्रालयाने संबंधित वैद्यकीय परिषदांना या संदर्भात माहिती कळवत नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात सुचविले होते. त्यानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन) यांच्या स्तरावर बैठक झाली होती. आयुष मंत्रालयांतर्गत येणारे आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील पत्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास प्राप्त झाले होते. त्यानुसार सोमवारी (ता. ४) विद्यापीठाने परिपत्रक जारी करत राज्यातील महाविद्यालयांनी या संदर्भात त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे सुचविले आहे.
प्रथम वर्षाचे वर्ग ८ मार्चपासून – University Permission to Start Medical College
आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी महाविद्यालयांर्गत इंटर्नशिप, द्वितीय वर्ष, तृतीय व अंतिम वर्षाचे वर्ग (थेअरी व प्रॅक्टिकल) तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करता येणार आहेत. महाविद्यालयांकडून त्यांच्या स्तरावर या संदर्भात निर्णय घेता येईल. कंटेन्मेंट झोनमधील महाविद्यालये मात्र सुरू करता येणार नाहीत. सध्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू असल्याने, प्रथम वर्षाचे वर्ग ८ मार्चपासून सुरू करण्याचे सुचविले आहे.
आरोग्यसेतूचा वापर, वर्गांचे निर्जंतुकीकरण
महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना मास्कचा वापर बंधनकारक असेल. प्रत्येक तासिकेनंतर वर्ग निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखणे आवश्यक असेल. तसेच सर्वांना आरोग्यसेतूचा नियमित वापर करावा लागेल. महाविद्यालय व वसतिगृहात नियमित वैद्यकीय तपासणी सुविधा असावी. संशयित रुग्णांवर तातडीने उपचार, तपासणी करण्याच्या सूचनांचा समावेश आहे.
सोर्स : सकाळ
Table of Contents