मराठवाडा विद्यापीठ सत्र परीक्षा होणार ऑफलाइन!!
University Exam Details
Marathwada University Exam Will Be On Offline Mode
University Exam Details : Tenth and twelfth standard examinations were conducted offline but undergraduate and postgraduate examinations were conducted online. Now that the situation has resumed, the exam will be conducted offline along with the offline test. Further details are as follows:-
दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन झाल्या परंतु पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. आता परिस्थिती पूर्ववत सुरू झाल्याने ऑफलाइन तासिकांसह परीक्षाही ऑफलाइन घेण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून नवीन नियमावली तयार करण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन, ऑफलाइन असे राहिले. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले परंतु उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. त्यासह या सत्रातील परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने परीक्षा ऑनलाइन घेण्यात येत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन झाल्या परंतु पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. आता पूर्ववत सुरू झाल्याने ऑफलाइन तासिकांसह परीक्षाही ऑफलाइन घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून नवीन नियमावली तयार करण्यात येत आहे.
- प्रत्यक्ष तासिका बंदमुळे शिक्षणात खंड पडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत तासिका, परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- विद्यापीठाचे आता दुसरे सञ सुरू होणार आहे.
- विद्यापीठ प्रशासन दुसऱ्या सञाच्या तयारीला लागले आहे.
- दुसऱ्या सञातील अभ्यासक्रमाच्या तासिका ऑफलाइन आणि परीक्षा देखील ऑफलाइन घेण्यात येणार आहेत.
- पदवीच्या प्रथम सत्रातील परीक्षा संपल्यामुळे संलग्नित अनेक महाविद्यालयांच्या तासिका सुरू झाल्या आहेत.
- तर पदव्युत्तरच्या परीक्षा संपल्या नसल्यामुळे दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमाच्या तासिका अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नसल्याचे सांगण्यात येते.
- या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासन परिसरातील विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांसाठी ऑफलाइन तासिका, परीक्षांबाबत नवीन नियमावली जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Maharashtra University Exam 2021
University Exam Details : All the university exams in the state will be conducted online. It is impossible to take the exam offline due to strict restrictions in the state. Higher and Technical Education Minister Uday Samant made it clear on Thursday
राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने. राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केले स्पष्ट.
राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जाहीर केले. कॉलेजांच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सामंत यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी, ‘राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन होणार.
Due to the growing influence of Corona, the state government announced a curfew. Examinations for undergraduate and postgraduate courses conducted on behalf of Babasaheb Ambedkar Marathwada University have been postponed.
पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित, विद्यापीठाकडून नवीन तारखा जाहीर
पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित, विद्यापीठाकडून नवीन तारखा जाहीर. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने घोषित केलेल्या संचारबंदीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
विद्यापीटाच्या वतीने सध्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. संभाजीनगर शहरासह मराठवाडा विभागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्य सरकारने 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग यांच्या आरोग्याची काळजी घेत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा स्थगित केल्या आहेत.
स्थगित करण्यात आलेल्या पदवीच्या परीक्षा 3 मे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 5 मे पासून पुन्हा घेतल्या जाणार आहेत. त्यासंबंधीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
University Exam Details – विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्च महिन्यात
University Exam Details : कोरोना संकट काळात विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पर्याय स्वीकारून घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावा, असा सूर शिक्षण विभागातून उमटत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कोरोनामुळे उद्भवलेल्या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्रात, उच्च शिक्षणातील संस्थांनी, उन्हाळी २०२० च्या परीक्षा बहुतांशी ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. त्या परिस्थितीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे योग्य होते.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे व त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लस पण अवघ्या काही दिवसात उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत, महाराष्ट्रात उच्च शैक्षणिक संस्थांनी हिवाळी २०२० च्या परीक्षा, ज्या मार्च २०२१ मध्ये होण्याची शक्यता आहेत, त्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेणे योग्य ठरेल, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तर पदवीचे अवमूल्यन
मागील ऑनलाइन पद्धतीत, बहुतांशी, परीक्षार्थींचे परीक्षा सोडवतांना निरीक्षण, देखरेख करण्यात आले नव्हते. त्यामुळे परीक्षार्थी काही गैरमार्गाने परीक्षा सोडवत आहे का, याबद्दल शंका निर्माण व्हायला वाव राहतो. निरीक्षण किंवा देखरेखी शिवाय परीक्षा घेण्याचे समर्थन निश्चितपणे कोणी करणार नाही. परीक्षार्थींनी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिल्यास त्याला गैर मार्गाचा अवलंब करण्याची संधी न देण्याची योजना ऑनलाइन पद्धतीत आणण्याची जरूरी आहे. अन्यथा अश्याने पदवीचेच अवमूल्यन होईल.
ऑनलाईन परीक्षांचे निरीक्षण होत नसल्याने गैरमार्गाचा वापर करून पेपर सोडवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घ्यावी किंवा अगदीच पर्याय नसेल तर ऑनलाइन परीक्षा घेताना निरक्षणाची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
सोर्स : सकाळ
Table of Contents
पन जे यूनिवर्सिटी ने ऑनलाइन clasess घेतले आहे त्या बेसिस बर offline exam साठी student ची तयारी नाहिये.जे समोर clasess मधे बसुन कळत नाही विचार करा कि ते ऑनलाइन clasess मधे कसे कळू शकेल. यावर नीट विचार करावा
ह्या वर्षी तरी परीक्षा online च घ्यायला हव्यात… मुलांना शिक्षण ऑनलाईन दिलंय…. पुढील वर्षी रेग्युलर type ने परीक्षा घ्याव्यात… म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष हे नेहमी प्रमाणे चालू राहील… सध्या मुलांच्या मानसिक तेचा विचार सरकारने करावा… आणि परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात…