पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दिलासा, वार्षिक सोडून सर्व परीक्षा रद्द
University Degree PG Exam Cancelled
पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दिलासा, वार्षिक सोडून सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याची बातमी आताच प्राप्त झाली आहे. खाली आम्ही या बातमीचा तपशील देत आहोत.
UGC University Degree PG Exam Cancelled – अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. BA हा तीन वर्षांचा कालावधी आहे त्यात सहा सेमीस्टर असतात. त्यातल्या सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार. बीकॉमचंही तसंच असणार आहे. जिथे ८ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टर होणार, १० सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेणार आहोत. MA, एमकॉम आणि इतर २ वर्षांचा कोर्स आहेत चार सेमीस्टर आहेत तिथे चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. कालावधी सहा सेमिस्टरचा आहे. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
- अंतिम वर्षे , अंतिम सत्र परीक्षा होणार
- बाकी वर्षाचे विद्यार्थी हे ग्रेडिंग होऊन पुढे जाणार .
- ग्रेडिंग करताना मागील वर्षाचे मार्कला 50 % तर यावर्षीच्या परफॉर्मन्सचे 50 % मार्क अशी विभागणी होणार
- बाकी वर्षाचे ग्रेडिंग होताना नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवणार पण नंतर त्यांनी त्या पेपरची परीक्षा द्यावी
- ATKT परीक्षा पुढील वर्षी पहिल्या 4 महिन्यात होणार
- अंतिम वर्ष परीक्षा 1 जुलै ते 30 जुलै ला घेणार , जर काही अडचण आली तर त्या त्या वेळी निर्णय
- सोशल डिस्टन्स ठेऊन परीक्षा
- प्रॅक्टिकल परीक्षा ऑनलाईन घ्यावी
- 12 वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना CET द्यावी लागणार, 1 जुलै ते 15 जुलै
- लॉकडाऊन मध्ये 45 दिवस विद्यार्थी हजर होते असे पकडून विद्यार्थ्यांची attendance लक्षात घेणार .पण सर्व विद्यार्थ्यांना परिक्षा देता याव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश मिळणार, मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते ३१ जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाउनची स्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. पदवीच्या केवळ अंतिम वर्षांचीच परीक्षा होणार आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
Ty BTech exam aahe ka
Law exam honar ka
ITI Walo kya hoga sir ji
What about B.ed exam? Now I am studying in class 1st year of B.ed?
WHAT ABOUT EXAM OF FIRST YEAR DIPLOMA IN PHARMACY 2020-21