नवीन अपडेट !! सिडको अंतर्गत सरळ भरतीप्रक्रियेला संघटनेचा विरोध!-Union Opposes CIDCO Recruitment!
Union Opposes CIDCO Recruitment!
सिडकोमध्ये सुरू असलेल्या क्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) संवर्गातील २४ पदांच्या सरळ भरती प्रक्रियेला सिडको कर्मचारी संघटनेने उघड विरोध केला आहे. संघटनेच्या मते, ही भरती प्रक्रिया सिडकोतील विद्यमान कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्त महिलांच्या पदोन्नतीच्या संधी हिरावणारी आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली असून, याआधी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र हिरे आणि सरचिटणीस नितीन कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, नियमाप्रमाणे रिक्त पदांपैकी ८०% पदे पदोन्नतीद्वारे आणि केवळ २०% पदे सरळ भरतीने भरली जावी, अशी तरतूद आहे. मात्र, सिडको प्रशासनाने यावेळी जाहिरात प्रसिद्ध करताना सहाय्यक विकास अधिकारी पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता बदलली असून, त्यामुळे नियमबाह्य भरतीचा आरोप संघटनेने लावला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ही भरती थांबवून प्रथम विद्यमान कर्मचाऱ्यांना व स्थानिक प्रकल्पग्रस्त महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने लावून धरली आहे. या मुद्द्यावर आता सिडको प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.