Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदवी अभ्यासक्रमानंतर आता थेट पीएच.डी.ला प्रवेश | UGC PhD Admission 2024

UGC PhD Admission 2024

UGC PhD Admission 2024

विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये (यूजीसी नेट) एक मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार चार वर्षे, आठ सत्रांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. विद्याथ्यनि ज्या विषयात पदवी मिळवली असेल, त्या विषयात पीएच.डी. करता येणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सहायक प्राध्यापक पदासाठी, कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीसाठी यूजीसी नेट ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) वर्षातून दोन वेळा घेतली जाते. डिसेंबर आणि जून अशा सत्रांत ही परीक्षा होते. अलीकडेच यूजीसीने घेतलेल्या निर्णयानुसार पीएच.डी. साठी नेट परीक्षेतून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठांतर्फे घेतल्या जाणाऱ्या पीएच.डी. प्रवेशपरीक्षेची आवश्यकता संपुष्टात आली आहे. यूजीसी नेट परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रा. एम. जगदेशकुमार यांनी बदलाची माहिती दिली. यापूर्वीच्या नियमानुसार यूजीसी नेट परीक्षा देण्यासाठी उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक असणे आवश्यक होते. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विषयात उमेदवारांना पीएच.डी. करता येत होती. प्रा. जगदेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील अथवा सत्रातील उमेदवारांना नेट परीक्षा देऊ शकतो

जून २०२४च्या सत्रापासून अंमलबजावणी

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना त्यांना ज्या विषयात पीएच. डी. करायची आहे, त्यासाठी परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. जून २०२४च्या सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.


UGC PhD Admission 2022

UGC PhD Admission 2022: Candidates who have passed the National Eligibility Test (NET) or Junior Research Fellowship will have their seats reserved for PhD. This decision is being taken under the National Education Policy. So if you are going to get admission for PhD, know the rules of admission of UGC. Further details are as follows:-

नॅशनल एलिजिबीलीटी टेस्ट म्हणजेच नेट परीक्षा किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिप उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी पीएचडीमध्ये जागा राखीव असणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे पीएचडीसाठी प्रवेश घेणार असाल तर यूजीसीच्या प्रवेशाचे नियम जाणून घ्या.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यूजीसीने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test, NET) किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (Junior Research Fellowship, JRF) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी पीएचडीच्या ६० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासाठी यूजीसी (Minimum standards and procedures for awarding a PhD degree) नियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. १० मार्च २०२२ रोजी झालेल्या आयोगाच्या ५५६ व्या बैठकीत यूजीसी विनियम २०२२ च्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तसेच पीएचडी प्रवेशासंबंधी यूजीसी नियम २०२२ वर सूचना मागविण्यात येत आहेत. पीएचडी प्रवेशासाठी संस्थांकडून प्रवेश परीक्षा घेतली जाते. अनेक संस्था यूजीसी नेट/जेआरएफ पात्र उमेदवारांना कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश देतात.

४ वर्षांची यूजी पदवी असलेल्यांना थेट प्रवेश 

In the context of National Education Policy (NEP) 2020, it is proposed to amend the rules for admission of PhD degree in various subjects in the country’s universities and affiliated colleges. Accordingly, candidates who have completed the four-year UG course can directly apply for PhD admission. Until now, only candidates doing PG after UG could get admission for PhD.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रस्तावानुसार, उच्च शिक्षण संस्था आता चार वर्षांची यूजी पदवी देण्यास सुरुवात करत आहेत. या यूजी कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय मिळेल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली विद्यापीठ (DU)या संस्थांनी याची सुरुवात केली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड